SSC Exam : स्टाफ सिलेक्शन कमिशन परीक्षा आता मराठीतूनही देता येणार

केंद्राने अलीकडेच एसएससी द्वारे आयोजित सरकारी नोकरी भरती परीक्षा १५ भाषांमध्ये घेण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून देशातील प्रत्येक तरुण या भरती प्रक्रियेचा भाग बनू शकेल.

SSC Exam : स्टाफ सिलेक्शन कमिशन परीक्षा आता मराठीतूनही देता येणार
SSC Examination

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सरकारी नोकरी (Government Job) करू इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 'स्टाफ सिलेक्शन कमिशन' (SSC) परीक्षा आता मराठीसह (Marathi) अन्य १४ भाषांमधून होणार आहे. आतापर्यंत ही परीक्षा देशभरात फक्त हिंदी आणि इंग्रजीतून घेतली जात होती. (SSC Exam in Marathi)

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, "केंद्राने अलीकडेच एसएससी द्वारे आयोजित सरकारी नोकरी भरती परीक्षा १५ भाषांमध्ये घेण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून देशातील प्रत्येक तरुण या भरती प्रक्रियेचा भाग बनू शकेल. आता SSC भरती परीक्षा हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त १३ प्रादेशिक भाषांमध्ये म्हणजे मराठी, आसामी, बंगाली, गुजराती, मल्याळम, कन्नड, तामिळ, तेलगू, ओरिया, उर्दू, पंजाबी, मणिपुरी (मैती) आणि कोकणी भाषेत होणार आहे.

CA फाउंडेशन परीक्षेच्या तारखांमध्ये बदल; ICAI कडून सुधारित वेळापत्रक जाहीर

लवकरच SSC द्वारे सर्व २२ अनुसूचित भाषांमध्ये देखील लेखी परीक्षा घेतली जाईल, असेह जितेंद्र सिंह यांनी सांगितले. दरम्यान, अभियांत्रिकी अभ्यासक्रम देखील प्रादेशिक भाषांमधून शिकवायचा निर्णय केंद्र शासनाने घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर ८ भाषांमध्ये अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या पुस्तकांचे भाषांतराचे काम सुरु आहे.

नुकतेच वैद्यकीय शिक्षण देखील हिंदीतून उपलब्ध व्हावे, अशी शिफारस केंद्र सरकारकडून करण्यात आली होती. या शिवाय आता NEET, JEE आणि CUET या परीक्षा हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त वेगवेगळ्या स्थानिक भाषांमधून  घेतल्या जात आहेत.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo