TCS वर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी नाखूश; विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर मोडला करार 

ऑनलाइन परीक्षा घेताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींबाबत उमेदवारांकडून आलेल्या तक्रारीनंतर विद्यापीठाने TCS सोबतचा करार रद्द करण्याच्या निर्णय घेतला आहे.

TCS वर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी नाखूश; विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर मोडला  करार 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

देशातील अनेक सरकारी आणि खाजगी परीक्षांमध्ये चुकीचे नियोजन पेपर फुटी सारख्या प्रकरणाच्या आरोपामुळे चर्चेत असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) सोबतचा करार आता ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीनेही (Oxford University) रद्द केला आहे. विद्यार्थ्यांच्या तक्रारीवरून (student complaints) युनिव्हर्सिटीने हा निर्णय घेतला आहे.

ऑनलाइन परीक्षा घेताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींबाबत उमेदवारांकडून आलेल्या तक्रारीनंतर विद्यापीठाने TCS सोबतचा करार रद्द करण्याच्या निर्णय घेतला आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू मार्टिन व्हीलिअम्स यांनी दिली आहे. 

व्हीलिअम्स म्हणाले, "महत्त्वाच्या घटनांचा काळजीपूर्वक विचार करून तसेच उमेदवार, शिक्षक आणि परीक्षा केंद्रांकडून मिळालेल्या अभिप्रायांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व उमेदवारांना आणि त्यांच्या पाठिंब्यामध्ये सहभागी असलेल्यांना उच्च दर्जाचा अनुभव प्रदान करणे हे आमचे प्राधान्य आहे."

युनिव्हर्सिटी संपूर्ण यूकेमधील ३० महाविद्यालयांद्वारे पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम  देते. दरवर्षी जगभरातून हजारो विद्यार्थी ऑक्सफर्डमध्ये जाण्यासाठी परीक्षा देतात. विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश परीक्षा देताना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला होता.त्यामुळे हा करार रद्द करण्यात आयाला आहे.