सीईटी सेलकडून प्रवेश परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर; MHT-CET १६ एप्रिलपासून

सीईटी सेलकडून पुढील वर्षी एकूण २० प्रवेश परीक्षा घेतल्या जाणार आहे. या परीक्षांमधील गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश दिला जातो.

सीईटी सेलकडून प्रवेश परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर; MHT-CET १६ एप्रिलपासून
MHTCET

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसह इतर पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी राज्य सामाईक प्रवेश चाचणी कक्षाकडून (State CET Cell) घेण्यात येणाऱ्या विविध प्रवेश परीक्षांचे पुढील वर्षीचे संभाव्य वेळापत्रक (Tentative Timetable) जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार अभियांत्रिकी (Engineering), कृषी व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीची एमएचटी-सीईटी (MHTCET) ही परीक्षा दि. १६ एप्रिल ते २ मे या कालावधीत होणार आहे.

 

सीईटी सेलकडून पुढील वर्षी एकूण २० प्रवेश परीक्षा घेतल्या जाणार आहे. या परीक्षांमधील गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश दिला जातो. ही प्रक्रियाही सीईटी सेलकडून राबविली जाते. त्यामध्ये अभियांत्रिकी, कृषी, औषधनिर्माणशास्त्र, वास्तुकला, हॉटेल मॅनेजमेंट, विधी, बी.एड. व एम.एड., एमबीए, एमसीए, बीएसस्सी नर्सिंग आदी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश प्रक्रियेचा समावेश आहे.

UPSC कडून शैक्षणिक वर्ष २०२४ साठी सर्व परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

 

सीईटी सेलकडून शुक्रवारी या सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षांच्या पुढील वर्षीच्या संभाव्य तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार पहिली MAH-B.Ed.M.Ed. (Integrated Course) सीईटी दि. २ मार्च रोजी घेतली जाणार आहे. तर बहुतेक विद्यार्थ्यांना प्रतिक्षा असलेल्या MHT-CET ही परीक्षा दि. १६ एप्रिल ते २ मे या कालावधीत नियोजित करण्यात आली आहे. मार्च ते मे या तीन महिन्यांत सर्व परीक्षा घेतल्या जाणार आहेत.

 

सर्व प्रवेश परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक पुढीलप्रमाणे -

 

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k