JEE Main परीक्षेचा अभ्यासक्रम होणार कमी; लवकरच अधिसुचना जारी होण्याची शक्यता

एनटीएचे महासंचालक सुबोध कुमार सिंग यांनी तसे दिले आहेत. लवकरच NTA नवीन अभ्यासक्रमाची अधिसूचना जारी करू शकते.  

JEE Main परीक्षेचा अभ्यासक्रम होणार कमी; लवकरच अधिसुचना जारी होण्याची शक्यता
JEE Main Syllabus

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

देशभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये (Engineering College) प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या JEE Mains (Joint Entrance Exam) या प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम कमी केला जाऊ शकतो. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) महासंचालक सुबोध कुमार सिंग (Subodh Kumar Singh) यांनी तसे दिले आहेत. लवकरच NTA नवीन अभ्यासक्रमाची अधिसूचना जारी करू शकते.

 

सुबोध कुमार सिंह यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, "जेईई मेन अभ्यासक्रमाबाबत सर्व राज्यांच्या बोर्डांशी चर्चा केली आहे. परीक्षेसाठी नोंदणी देखील अंतिम अभ्यासक्रमाच्या अधिसूचनेसह सुरू होईल. परीक्षेचा अंतिम अभ्यासक्रम एनटीएच्या तज्ज्ञ समितीच्या मान्यतेनंतर प्रसिद्ध केला जाईल."

राष्ट्रीय तांत्रिक शिक्षक प्रशिक्षण परीक्षेचा निकाल जाहीर

 

"यावर्षी परीक्षेच्या नोंदणीच्या तारखेसह, निकालाची तारीख देखील अगोदर जाहीर केली जाईल. दरवर्षी निकालाच्या तारखेबाबत विद्यार्थ्यांच्या मनात प्रचंड उत्सुकता असते. याचा विद्यार्थ्यांना फायदा तर होईलच शिवाय संस्थांना त्यांच्या प्रवेश प्रक्रियेचे  नियोजन करणे सोपे जाईल. तसेच  दरवर्षी प्रमाणे या वेळी देखील NTA प्रत्येक उमेदवाराला त्याच्या/तिच्या घराजवळ निवडलेले परीक्षा केंद्र वाटप करण्याचा प्रयत्न करेल. प्रत्येक उमेदवाराला त्याच्या कायमस्वरूपी किंवा निवासी पत्त्याजवळ एक परीक्षा केंद्र मिळावे आणि कोणत्याही मुलाला परीक्षेसाठी त्याच्या राज्याबाहेर जावे लागू नये, यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू,’’ असे सुबोध कुमार सिंह यांनी सांगितले.

 

वास्तविक पाहता कोविड महामारीच्या काळात CBSE आणि अनेक राज्य मंडळांनी मुलांवरील परीक्षेचा दबाव कमी करण्यासाठी इयत्ता ९ वी ते १२वीच्या अभ्यासक्रमाचा काही भाग कमी केला होता. NCERT च्या पुस्तकांचे काही प्रकरण बोर्डाच्या परीक्षेच्या अभ्यासक्रमातून काढून टाकण्यात आले होते. पण, NEET आणि JEE Mains सारख्या प्रवेश परीक्षांचा अभ्यासक्रम कमी केला गेला नव्हता.

 शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k