SSC, HSC Exam : फॉर्म नं. १७ भरण्यासाठी राज्य मंडळाकडून मुदतवाढ

राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी ही माहिती दिली. विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरता येणार असून ऑफलाईन अर्ज भरता येणार नाहीत.

SSC, HSC Exam : फॉर्म नं. १७ भरण्यासाठी राज्य मंडळाकडून मुदतवाढ

 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (SSC Board) फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी (SSC Exam) व बारावीच्या परीक्षेसाठी (HSC Exam) विद्यार्थ्यांना खाजगीरित्या फॉर्म नं. १७ (Form no. 17) भरून परीक्षेस बसण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना अतिविलंब शुल्कासह अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता विद्यार्थ्यांना अतिविलंब शुल्कासह दि. ७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहेत.

 

राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी ही माहिती दिली. विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरता येणार असून ऑफलाईन अर्ज भरता येणार नाहीत. इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रति दिन वीस रुपये अतिविलंब शुल्क भरून ऑनलाईन अर्ज भरता येईल, अशी माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे.

संचारबंदी, इंटरनेट सेवा बंदमुळे विद्यार्थी हवालदिल; परीक्षेला मुकण्याची भीती, अर्जही भरता येईनात

 

विद्यार्थ्याने अर्ज भरण्याकरिता १) शाळा सोडल्याचा दाखला (मूळ प्रत), नसल्यास व्दितीय प्रत व प्रतिज्ञापत्र २) आधारकार्ड ३) स्वत:चा पासपोर्ट आकारातील फोटो स्वतःजवळ ठेवावा. ऑनलाईन अर्ज भरताना सदर कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावयाची आहेत. कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्कॅनर / मोबाईलव्दारे कागदपत्राचे फोटो काढून ते अपलोड करावेत. विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी पुढील संपर्कासाठी अनिवार्य (compulsor) आहे.

 

संपूर्ण अर्ज भरुन झाल्यावर भरलेल्या अर्जाची प्रत विद्यार्थ्याला त्याने अर्जातः नमूद केलेल्या ई-मेलवर पाठविली जाणार आहे. तसेच या संपूर्ण भरलेल्या अर्जाची प्रिंटआऊट, शुल्क पावती व हमीपत्र यासह दोन प्रतीत काढून घ्यावी. विद्यार्थ्यांनी अर्ज ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोच पावतीच्या दोन छायाप्रती व मूळ कागदपत्रे नाव नोंदणी अर्जावर नमूद केलेल्या माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विहीत मुदतीत जमा करावयाची आहे.  

 

खाजगी विद्यार्थ्यांसाठी नाव नोंदणी शुल्क – इयत्ता दहावी – १ हजार रुपये नोंदणी शुल्क व १०० रुपये प्रक्रिया शुल्क आणि प्रति दिन २० रुपये अतिविलंब शुल्क तर इयत्ता बारावीसाठी ६०० रुपये नोंदणी शुल्क व १०० रुपये प्रक्रिया शुल्क आणि प्रति दिन २० रुपये अतिविलंब शुल्क भरावे लागेल.  याव्यतिरिक्त विलंब व अतिविलंब शुल्कही भरावे लागेल. ऑनलाईन अर्ज भरताना कोणतीही अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्र. ०२० - २५७०५२०७ / २५७०५२०८/२५७०५२७१ वर संपर्क साधावा, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील वेबसाईटचा वापर करावा.

.१० वी - http://form17.mh-ssc.ac.in

१२ वी - http://form17.mh-hsc.ac.in

 शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k