बी.बीसीए/बीबीए/बीएमएस/बीबीएम सीईटी परीक्षेचे अर्ज भरण्यात पुन्हा मुदतवाढ 

परीक्षेचे अर्ज भरण्यास येत्या 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

बी.बीसीए/बीबीए/बीएमएस/बीबीएम सीईटी परीक्षेचे अर्ज भरण्यात पुन्हा मुदतवाढ 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करीता बी. बीसीए/बीबीए/बीएमएस/बी बीएम (B. BCA/BBA/BMS/B BM)या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीता महा-बी.बीसीए/बीबीए/बीएमएस/बीबीएम सीईटी २०२४ ही सामाईक प्रवेश परीक्षा प्रथमच महाराष्ट्र राज्यात घेण्यात येणार आहे.या परीक्षेचे अर्ज (EXAMINATION APPLICATION)भरण्यास येत्या 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ (Extension)देण्यात आली आहे.

सीईटी सेल तर प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार एमबीए इंटीग्रेटेड आणि एमसीए इंटीग्रेटेड या अभ्यासक्रमांना शैक्षणिक वर्ष २०२४-२५ प्रवेशासाठी महा- बी.बीसीए/बीबीए/बीएमएस/बीबीएम सीईटी २०२४ या सामाईक प्रवेशमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करीत ज्या उमेदवारांना एमबीए इंटीग्रेटेड आणि एमसीए इंटीग्रेटेड या अभ्यासक्रमाना प्रवेश घ्यावयाचे आहेत, अशा उमेदवारांकरीता महा-बी.बीसीए/बीबीए/बीएमएस/बीबीएम सीईटी २०२४ सामाईक प्रवेश परीक्षा देणे अनिवार्य आहे. याची सर्व संबंधित उमेदवार/पालक/संस्थांनी नोंद घ्यावी.

महा-बी.बीसीए/बीबीए/बीएमएस/बीबीएम सीईटी २०२४ आणि एमबीए इंटीग्रेटेड आणि एमसीए इंटीग्रेटेड ही सामाईक प्रवेश परीक्षा येत्या 27 ते 29 मे दारम्यान घेतली जाणार आहे.