सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 3000 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु 

महाराष्ट्रात सर्वाधिक रिक्त पदे उपलब्ध आहेेत.

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 3000 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

तुम्हाला सरकारी बँकेत (bank)नोकरी करायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने (Central Bank of India) 3000 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी nats.education.gov.in या अधिकृत वेबसाइटवरुन अर्ज करू शकतात.

 SBI ने पदवीधर विद्यार्थ्यांकडून अप्रेंटिसशिप म्हणून काम करण्यासाठी अर्ज मागवले आहेत. या भरतीद्वारे बँकेत काम करण्यास इच्छुक असलेले विद्यार्थी अप्रेंटिसशिप पोर्टलला भेट देऊन स्वत:ची नोंदणी करू शकतात. इच्छूक विद्यार्थी 21 फेब्रुवारी ते 6 मार्च पर्यंत अर्ज करू शकतात. महाराष्ट्रात सर्वाधिक रिक्त पदे उपलब्ध आहेेत. त्यानंतर उत्तर प्रदेश (UP), मध्य प्रदेश (मध्य प्रदेश), गुजरात आणि बिहारमध्ये रिक्त पदे आहेत.

अर्जदार अर्ज करताना फक्त एक क्षेत्र निवडू शकतात. अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचे वय 20 ते 28 वर्षे दरम्यान असावे.ऑनलाईन फी भरल्यानंतर बँकेत शिकाऊ उमेदवारीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 10 मार्च 2024 रोजी होणाऱ्या ऑनलाइन लेखी परीक्षा द्यावी लागेल.