MPSC चा कारभार पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्या हाती

किशोर राजे-निंबाळकर हे बुधवारी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना १ वर्ष ११ महिन्यांचा कार्यकाळ मिळाला. ते भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी होते.

MPSC चा कारभार पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्या हाती

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला (MPSC) नवीन कारभारी मिळाले आहे. राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ (Rajnish Seth) यांच्याकडे आयोगाच्या अध्यक्षपदाची सुत्रे देण्यात आली आहेत. अध्यक्ष पदावरून किशोर राजे निंबाळकर यांची सेवानिवृत्ती झाल्यानंतर हे पद रिक्तच होते. सेठ यांच्या रुपाने एमपीएससीला आयपीएस अधिकारी मिळाले आहेत.

 

किशोर राजे-निंबाळकर हे बुधवारी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना १ वर्ष ११ महिन्यांचा कार्यकाळ मिळाला. ते भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी होते. एमपीएससीच्या अध्यक्ष निवडीची प्रक्रिया काही दिवस आधीच सुरू झाली होती. त्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. रजनीश सेठ यांनीही अध्यक्षपदासाठी इच्छूक असल्याने अर्ज केला होता.

वैद्यकीय शिक्षण विभागात पाच हजारांहून अधिक पदांची कंत्राटी भरती

 

राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे अर्जांची छाननीची प्रक्रिया होती. त्यानुसार या समितीने तीन जणांची नावे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठविली होती. त्यामध्ये सेठ यांच्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने आणि वन सेवेतील निवृत्त अधिकारी प्रदीपकुमार यांचा समावेश होता.

 

तिघांमध्ये सेठ यांच्या पारडे जड असल्याचे बोलले जात होते. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी रजनीश सेठ यांना पसंती दिली. सेठ हे १९८८ च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी आहेत. दरम्यान, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष या नियुक्तीकडे लागले होते. काही दिवसांपूर्वीच एमपीएसचीच्या परीक्षेतील हायटेक कॉपीचा प्रकार समोर आला आहे. तसेच निकालांला होणारा विलंबही चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सेठ यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k