सीईटी परीक्षेत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या
या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच विजापूर नाका पोलिस ठाण्याचे हवालदार युवराज जाधव घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नातेवाइकांच्या मदतीने तिला बेशुद्धावस्थेत छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पुढील प्रकरणाचा पोलिस तपास करत आहेत
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
सोलापूर इथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सीईटीच्या परीक्षेत कमी गुण (Low marks in CET exam) मिळाल्याने एका १८ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. आपल्या राहत्या घरातील स्लॅबच्या लोखंडी हुकला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन विद्यार्थिनीने आत्महत्या (Student commits suicide by hanging) केली. ऐमन मोहमद शकील नदाफ (Aiman Mohammad Shakeel Nadaf) (वय १८, रा. मेरा भारत महाननगर, विजापूर रोड) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऐमन अभ्यासात हुशार होती. ती नेहमी तिच्या स्टडी रूममध्ये अभ्यास बसलेली असायची. रविवारी सकाळी आठ वाजूनही तिच्या रूमचा दरवाजा न उघडल्याने दरवाजा ठोठावला, पण आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर घरच्यांना संशय आली त्यांनी रूमच्या खिडकीतून डोकावून बघितल्यानंतर फॅनला मृतदेह लटकल्याचे चित्र दिसून आले.
पेपरफुटी कायदा : खासगी विधेयक सभागृहात मांडले, लाखो उमेदवारांना मिळणार न्याय
या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच विजापूर नाका पोलिस ठाण्याचे हवालदार युवराज जाधव घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नातेवाइकांच्या मदतीने तिला बेशुद्धावस्थेत छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पुढील प्रकरणाचा पोलिस तपास करत आहेत.
माझे काही बरेवाईट झाल्यास आई वडिलांना दोषी धरू नये, असे एका वहीच्या पुठ्यावर तिने लिहिल्याची माहिती पोलिसांनी दिली. ऐमन नुकतीच बारावी उत्तीर्ण झाली होती. त्यानंतर, फार्मसीच्या प्रवेशासाठी तिने सीईटी दिली होती. त्या सीईटी परीक्षेत तिला कमी गुण मिळाल्याने तिला प्रवेश घेण्यासाठी काही अडचणी येत होत्या. यामुळे ती तणावात होती. यामुळे तिने हे पाऊल उचललं असावे, अशी अंदाज तिच्या नातेवाइकांनी वर्तवविला आहे.
eduvarta@gmail.com