CET Exam : चुका टाळण्यासाठी कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन
सुमारे ६ लाख ७७ हजार ५०७ विद्यार्थ्यांनी एमएसटी सीईटी परीक्षा दिली. तीन भाषांत घेण्यात आलेल्या या परीक्षेत २७ हजार ८३७ विद्यार्थ्यांच्या प्रश्न संचातील मराठी व उर्दू भाषेतील २१ चुका होत्या. निकाल समाधानकारक न लागल्याने फेरपरीक्षा घेण्यात आली. त्यामुळे अशी चूक करणाऱ्या संबंधितांवर काय कारवाई केली, असे वंजारी म्हणाले.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्याबाहेरील एमएचटी-सीईटी परीक्षा (MHT-CET Exam) केंद्र संशयास्पद निघाल्यामुळे ती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, एमएचटी-सीईटीच्या परीक्षेत चुका होऊ नयेत, यासाठी कुलगुरु डॉ. सुनील भिरुड (Chancellor Dr. Sunil Bhirud) यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची समिती नियुक्त (7-member committee appointed) केली आहे. याबाबतची माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Higher and Technical Education Minister Chandrakant Patil) यांनी विधान परिषदेत केली.
आमदार अभिजीत वंजारी यांनी याबाबतचा प्रश्न विचारला होता. सुमारे ६ लाख ७७ हजार ५०७ विद्यार्थ्यांनी एमएसटी सीईटी परीक्षा दिली. तीन भाषांत घेण्यात आलेल्या या परीक्षेत २७ हजार ८३७ विद्यार्थ्यांच्या प्रश्न संचातील मराठी व उर्दू भाषेतील २१ चुका होत्या. निकाल समाधानकारक न लागल्याने फेरपरीक्षा घेण्यात आली. त्यामुळे अशी चूक करणाऱ्या संबंधितांवर काय कारवाई केली, वंजारी सांगितले.
की इंग्रजी भाषेतील प्रश्नपत्रिकेत २१ प्रकारच्या त्रुटी निघाल्यामुळे ५ मे २०२५ रोजी फेरपरीक्षा घेतली. या त्रुटीसंदर्भात तीन सदस्यांना कारणे दाखवा नोटीस दिली. त्यांचा खुलासा समाधानकारक नसल्याने त्यांची सेवा खंडित करण्यात आली आहे. तसेच, कुलगुरु भिरुड यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या सात सदस्यांच्या कमिटीला प्रश्नसंच तयार करण्यासाठी तज्ज्ञांची नेमणूक करण्याची कार्यपद्धती, प्रश्न संचानुसार प्रश्नपत्रिका तयार करण्याची कार्यपद्धती अशी कार्यकक्षा आखून देण्यात आली आहे, मंत्री पाटील म्हणाले.
पूर्वपरीक्षा, स्पर्धा परीक्षा टीसीएस किंवा आयबीपीएस कंपन्यांकडून घेतली जात असून, गेल्या काही वर्षात मोठा घोळ झाल्याची ८९ प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे या परीक्षा यापुढे राज्याबाहेरील केंद्रावर घेतल्या जाणार नाहीत, असेही मंत्री पाटील म्हणाले.