मोठी बातमी: विद्यापीठाकडून 97 हजार PRN ब्लॉक विद्यार्थ्यांना दिलासा; परीक्षेची संधी मिळाली

विद्यापीठाच्या विद्या परिषदेच्या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली.तसेच परीक्षा मंडळाच्या बैठकीत याबाबत आढावा घेऊन बुधवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत त्याव शिक्कामोर्तब करण्यात आले.त्यामुळे 97 हजार व इतर 16 हजार अशा एक लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.

मोठी बातमी: विद्यापीठाकडून 97 हजार PRN ब्लॉक विद्यार्थ्यांना दिलासा; परीक्षेची संधी मिळाली

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

PRN block News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी (Savitribai Phule Pune University)संलग्न विविध महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या सुमारे एक लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षेची संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय विद्यापीठातर्फे घेण्यात आला आहे.पदवी पूर्ण करण्याची मुदत संपुष्टात आल्यामुळे पीआरएन ब्लॉक(PRN block)झालेल्या विद्यार्थ्यांचे पीआरएन लवकरच अनब्लॉक केले जाणार आहेत.त्यामुळे काही कारणांमुळे पदवी पूर्ण करू न शकलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा देऊन पदवी पूर्ण करता येणार आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत (Management Council Meeting)याबाबत बुधवारी सकारात्मक निर्णय घेण्यात आला. 

गेल्या काही महिन्यांपासून पीआरएन ब्लॉक विद्यार्थ्यांना परीक्षेची संधी उपलब्ध करून द्यावी,अशी मागणी केली जात होती.काही विद्यार्थ्यांनी याबाबत विद्यापीठाच्या पदाधीकाऱ्यांची भेटही घेतली होती.त्यानंतर विद्यापीठाच्या विद्या परिषदेच्या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली.तसेच परीक्षा मंडळाच्या बैठकीत याबाबत आढावा घेऊन बुधवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत त्याव शिक्कामोर्तब करण्यात आले.त्यामुळे 97 हजार विद्यार्थ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमावलीनुसार विद्यार्थ्यांना मर्यादित कालावधीत पदवी पूर्ण करावी लागते. मात्र, काही कारणांमुळे विद्यार्थ्यांचे एक किंवा दोन विषय राहिल्याने विद्यार्थ्यांना पदवी मिळत नाही. त्यासाठी विद्यापीठाने N+2  आणि N+2+1  चा निर्णय घेतला आहे.त्यामुळे पुणे, अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यातील  97 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.तर N+2+1  चा लाभही अनेक विद्यार्थ्यांना मिळाला आहे.