पाषाण तलावात नवीन जातीचा शोध, प्लॅनॅरिया प्रजातीचा चार दशकांनंतरचा नवा नमुना
ही प्रजाती पश्चिम भारतातील पाषाण तलावात आढळून आली असून तिचा नमुना भारतीय प्राणीसंग्रहालयात (Zoological Survey of India - ZSI) जमा करण्यात आला आहे. Dugesia punensis हे नाव पुणे शहराच्या स्थानिकतेशी सुसंगत ठेवून देण्यात आले आहे. सदरची प्रजाती पुण्यात आढळली कारणाने पुण्याचे नाव देण्यात आले.
एज्युवार्त न्यूज नेटवर्क
पाषाण तलावातून एक नवा जैववैज्ञानिक शोध (New biological discovery) समोर आला असून, ‘Dugesia punensis’ या नवीन प्लॅनॅरिया प्रजातीची नोंद (Planaria species record) पुण्यातील मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, गणेशखिंड येथील प्राणीशास्त्र संशोधन केंद्रातील पीएच.डी. स्कॉलर मिथिला चिंचाळकर (Ph.D. Scholar Mithila Chinchalkar) व त्यांचे संशोधन मार्गदर्शक डॉ. रविंद्र क्षीरसागर (Research Guide Dr. Ravindra Kshirsagar) यांनी केली आहे. विशेष बाब म्हणजे 1983 नंतर प्रथमच भारतात प्लॅनॅरिया प्रजातीच्या नव्या जातीचा शास्त्रीय नोंदणीसह शोध (New species of Planaria discovered in India with scientific registration) लावण्यात आला आहे.
महाज्योती : जेईई, नीट, एमएचटी-सीईटी प्रशिक्षणासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
ही प्रजाती पश्चिम भारतातील पाषाण तलावात आढळून आली असून तिचा नमुना भारतीय प्राणीसंग्रहालयात (Zoological Survey of India - ZSI) जमा करण्यात आला आहे. Dugesia punensis हे नाव पुणे शहराच्या स्थानिकतेशी सुसंगत ठेवून देण्यात आले आहे. सदरची प्रजाती पुण्यात आढळली कारणाने पुण्याचे नाव देण्यात आले. सदर संशोधन Record of Zoological India या नामांकित जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे. या संशोधनाबाबत संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. गजानन एकबोटे, सहकार्यवाह प्रा. डॉ. ज्योत्स्ना एकबोटे व प्राचार्य डॉ. संजय खरात यांनी अभिनंदन केले. WRC ZSI (Western Regional Centre, Zoological Survey of India) येथील वैज्ञानिकांनीही या संशोधकांचे अभिनंदन व मान्यता दिली आहे.
प्लॅनॅरिया ही जलचर कृमी प्रजाती पुनरुत्पादनाच्या विलक्षण क्षमतेसाठी प्रसिद्ध आहे. शरीराचे तुकडे झाले तरी त्यातून संपूर्ण शरीर पुनः निर्माण करण्याची क्षमता या प्रजातीमध्ये आहे. ही वैशिष्ट्ये प्लॅनॅरिया संशोधनाला स्टेम सेल (मूल पेशी) संशोधनासाठी अत्यंत उपयुक्त ठरवतात. याच क्षेत्रात मिथिला चिंचाळकर व डॉ. रविंद्र क्षीरसागर यांचे संशोधन कार्य सुरू असून, नवीन प्रजातीचा शोध हे या कार्यातील महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. हा शोध केवळ स्थानिक जैवविविधतेच्या दृष्टीनेच नव्हे, तर पुनरुत्पादनशास्त्र व स्टेम सेल संशोधनाच्या जागतिक पातळीवरही महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
eduvarta@gmail.com