केंद्रीय विद्यालयांमधील प्रवेशासाठी 'या' तारखेपासून करता येणार अर्ज...

सर्व केंद्रीय विद्यालयांमधील बाल वाटिका, इयत्ता 1 आणि उच्च वर्ग (KVS प्रवेश 2024) च्या प्रवेश अर्ज 1 एप्रिलपासून भरता येणार आहेत. प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम मुदत 15 एप्रिल आहे.  

केंद्रीय विद्यालयांमधील प्रवेशासाठी 'या' तारखेपासून करता येणार अर्ज...

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

आपल्या पाल्याचा प्रवेश केंद्रीय विद्यालयात (Admission to Kendriya Vidyalaya) व्हावा यासाठी प्रयत्न करू इच्छिणाऱ्या पालकांसाठी महत्त्वाची माहिती समोर येत आहे. केंद्रीय विद्यालय संघटन (KVS) ने यावर्षी देशभरातील केंद्रीय विद्यालयांमध्ये 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी बाल वाटिका (म्हणजे नर्सरी) ते माध्यमिक (दहावी) (Nursery to Class 10th ) वर्ग प्रवेशासाठी अधिसूचना जारी केली आहे. संस्थेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, सर्व केंद्रीय विद्यालयांमधील बाल वाटिका, इयत्ता 1 आणि उच्च वर्ग (KVS प्रवेश 2024) च्या प्रवेश अर्ज 1 एप्रिलपासून भरता येणार (The application form can be filled from April 1)आहेत. प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम मुदत 15 एप्रिल आहे.  

केंद्रीय विद्यालयांच्या बाल वाटिका-१, बाल वाटिका-२ आणि बाल वाटिका-३ या वर्गांसह इयत्ता १ (KVS प्रवेश २०२४) प्रवेशासाठी नोंदणी अर्ज ऑनलाइन भरता येतील. 1 एप्रिल पासून पालकांना KVS च्या अधिकृत वेबसाइट kvsangathan.nic.in वर ऑनलाईन अर्ज भरता येईल.

दुसरीकडे, केंद्रीय विद्यालयांमध्ये इयत्ता 2 ते इयत्ता 10वीपर्यंतच्या जागा रिक्त असतील तरच प्रवेश दिला जाणार आहे. या वर्गांमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालकांना त्यांच्या निवासस्थानाजवळील केंद्रीय विद्यालयाशी संपर्क साधावा लागेल आणि त्या शाळेच्या कार्यालयातून प्रवेश अर्ज घ्यावा लागेल. हा फॉर्म शाळेने ठरवून दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत जमा करावा लागेल.


बाल वाटिका 1 मध्ये प्रवेशासाठी, 31 मार्च 2024 रोजी विद्यार्थ्याचे वय 3 वर्षांपेक्षा कमी आणि 4 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
बाल वाटिका 2 मध्ये प्रवेशासाठी, 31 मार्च 2024 रोजी विद्यार्थ्याचे वय 4 वर्षांपेक्षा कमी आणि 5 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
बाल वाटिका 3 मध्ये प्रवेशासाठी, 31 मार्च 2024 रोजी विद्यार्थ्याचे वय 5 वर्षांपेक्षा कमी आणि 6 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
इयत्ता 1 च्या प्रवेशासाठी, 31 मार्च 2024 रोजी विद्यार्थ्याचे वय 6 वर्षांपेक्षा कमी आणि 8 वर्षांपेक्षा जास्त नसावे.