UPSC अभियांत्रिकी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर

आयोगाकडे जून २०२३ मध्ये लेखी परीक्षा घेण्यात आली होती. तर सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यांत मुलाखती पार पडल्या. त्यानंतर काही दिवसांतच आयोगाकडून निकाल जाहीर करण्यात आला आहे.

UPSC अभियांत्रिकी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

अभियांत्रिकी सेवा परीक्षेचा (UPSC ESE 2023) अंतिम निकाल केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) जाहीर केला आहे. हा निकाल आयोगाच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाहीर करण्यात आला आहे. एकूण ४०१ उमेदवारांनी यश संपादन केले आहे. त्यामध्ये सर्वाधिक १३३ उमेदवार ओबीसी प्रवर्गातील तर १२० उमेदवार खुल्या प्रवर्गातील आहेत.

 

आयोगाकडे जून २०२३ मध्ये लेखी परीक्षा घेण्यात आली होती. तर सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यांत मुलाखती पार पडल्या. त्यानंतर काही दिवसांतच आयोगाकडून निकाल जाहीर करण्यात आला आहे. एकूण ४८६ उपलब्ध जागांसाठी ही परीक्षा घेण्यात आली. त्यापैकी स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये १७८, यांत्रिक अभियांत्रिकीमध्ये ४६, विद्युत अभियांत्रिकीमध्ये ६४ आणि इलेक्ट्रॉनिक आणि दूरसंचार अभियांत्रिकीमध्ये एकूण ११३ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. तर १०४ उमेदवारांची तात्पुरती निवड करण्यात आली आहे.

प्राध्यापकांकडे बनावट सेट-नेट प्रमाणपत्र; पडताळणीत धक्कादायक माहिती समोर, 'युजीसी'चे पत्र

  

असा पहा निकाल 

* अधिकृत वेबसाइट upsc.gov.in ला भेट द्या.

* वेबसाइटच्या होम पेजवर नवीन काय आहे या विभागात जा आणि "अंतिम निकाल: अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा, 2023" या लिंकवर क्लिक करा.

* आता एका नवीन पेजवर तुम्हाला PDF ची लिंक दिसेल, त्यावर क्लिक करा.

*  स्क्रीनवर निकाल  PDF स्वरूपात उघडेल जो तुम्ही डाउनलोड आणि सेव्ह करू शकता.

* आता तुम्ही त्यात तुमचे नाव आणि भूमिका तपासू शकता. या यादीत ज्या उमेदवारांचे नाव आणि रोल नंबर नमूद केलेले आहेत तेच उमेदवार नियुक्ती मिळण्यास पात्र असतील.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO