शिक्षक आणि पदवीधर मतदानासाठी विशेष नैमित्तीक रजा मंजूर, आयोगाचे जिल्ह्याधिकाऱ्यांना पत्र

निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कर्मचाऱ्यांना विशेष नैमित्तीक रजा मंजूर करावी, असे पत्र राज्य निवडणुक आयोगाने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे. 

शिक्षक आणि पदवीधर मतदानासाठी विशेष नैमित्तीक रजा मंजूर, आयोगाचे जिल्ह्याधिकाऱ्यांना पत्र

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

कोकण पदवीधर, मुंबई पदवीधर आणि शिक्षक आणि नाशिक शिक्षण मतदार संघाच्या (Konkan Graduates, Mumbai Graduates and Teachers and Nashik Education Constituencies) निवडणुका २६ जून रोजी होवू घातल्या आहेत. निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कर्मचाऱ्यांना विशेष नैमित्तीक रजा मंजूर (Special casual leave granted) करावी, असे पत्र राज्य निवडणुक आयोगाने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे. 

भारत निवडणूक आयोगाच्या २४ मे रोजीच्या प्रसिद्धीपत्रकान्वये कोकण विभाग पदवीधर, मुंबई पदवीधर व शिक्षक तसेच नाशिक शिक्षक मतदारसंघांचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. सदर निवडणूकीचे मतदान बुधवार दि. २६ जून रोजी सकाळी ७.०० ते सायंकाळी ६.००  पर्यंत असणार आहे. तर मतमोजणी दि. १ जुलै रोजी होणार आहे. 

लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ च्या कलम १३५ नुसार लोकसभा विधानसभा निवडणुकाच्या मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना भरपगारी रजा देण्यात तरतूद आहे. मात्र, विधानपरिषद शिक्षक पदवीधर मतदार संघाकरिता मर्यादित स्वरुपात असल्याने, त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या दि.२३ जुन २०११ रोजीच्या शासन निर्णयान्वये पदवीधर / शिक्षक निवडणुकीमध्ये मतदार असल्या व्यक्तांना विशेष नैमित्तीक रजा केलेली आहे. सदरचा शासन निर्णय कार्यालयाच्या www.cco.maharashtra.gov.in वर उपलब्ध आहे. सदरची रजा ही त्यांच्या अनुज्ञेय असलेल्या नैमित्तीक रजेव्यतिरिक्त असणार आहे.