शालार्थ आयडी :  शिक्षकांसाठी आनंदाची बातमी, आठवड्याभरात प्रस्तावावर निर्णय

राजेंद्र अहिरे म्हणाले, पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे ' शालार्थ आयडी ' ची एकूण ६१९ प्रकरणे आले आहेत. त्यातील १९९ प्रकरणे मान्य झाली असून २१ प्रकरणे अमान्य झाली आहेत. तर ३९२ प्रकरणांवर प्रकरणे प्रलंबित आहेत.

शालार्थ आयडी :  शिक्षकांसाठी आनंदाची बातमी, आठवड्याभरात प्रस्तावावर निर्णय

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

केवळ शालार्थ आयडी (Shalarth ID) मिळाला नाही म्हणून वेतनापासून वंचित असलेल्या अनेक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी (teachers, non-teaching staff) आनंदाची बातमी आहे. ऑक्टोबर अखेरपर्यंत सर्व 'शालार्थ आयडी' ची प्रकरणे पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक (dyd ) कार्यालयाकडून निकाली काढली जाणार आहेत. त्यामुळे शालार्थ आयडीमुळे रखडलेले वेतन (retainer salary) मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. परिणामी शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा : अखेर राज्य अभ्यासक्रम आराखड्यावर प्रतिक्रियांसाठी दिली मुदतवाढ

टप्पा अनुदानावर आलेल्या शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शालार्थ आयडी प्राप्त झाल्यानंतर वेतन सुरू होते. परंतु, गेल्या अनेक महिन्यांपासून विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय येथे शालार्थ आयडीची प्रकरणे प्रलंबित होती. आमदार दत्तात्रय सावंत यांनी शुक्रवारी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाला भेट देऊन शालार्थ आयडी संदर्भात आढावा घेतला. तसेच कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर प्रकरणे निकाली काढण्याच्या सूचना दिल्या.

राज्यात काही ठिकाणी शालार्थ आयडी मिळण्यास विलंब होत असल्याने काही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा जीव गेला. सोलापूर येथील एका शिक्षकेतर कर्मचाऱ्याने आत्महत्या करून आपले जीवन संपवले. सुमारे दहा ते वर्ष पंधरा वर्ष सेवा करून हातात तोंडाशी आलेला घास केवळ शालार्थ आयडी मिळत नसल्याने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संतप्त भावना आहे. अनेक संघटनांनी याबाबत आंदोलने केली तरीही प्रश्न सुटत नसल्याने शुक्रवारी आमदार दत्तात्रय सावंत यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला.

पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे म्हणाले, पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे ' शालार्थ आयडी ' ची एकूण ६१९ प्रकरणे आले आहेत. त्यातील १९९ प्रकरणे मान्य झाली असून २१ प्रकरणे अमान्य झाली आहेत. तर ३९२ प्रकरणांवर प्रकरणे प्रलंबित आहेत. पुढील दोन दिवसात त्यावर निर्णय घेतला जाणार आहे.