सेट परीक्षेचा निकाल अडकला मराठा आरक्षण अंमलबजावणीत; 31 मे पर्यंत निकाल होणार जाहीर 

विद्यापीठ प्रशासनाकडून  यावर राज्य शासनाचा अभिप्राय घेतला जाणार आहे.त्यानंतरच सेट परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

सेट परीक्षेचा निकाल अडकला मराठा आरक्षण अंमलबजावणीत; 31 मे पर्यंत निकाल होणार जाहीर 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) सेट विभागातर्फे (Set Department) महाराष्ट्र व गोवा राज्यातील (State of Maharashtra and Goa) विद्यार्थ्यांसाठी 7 एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या सेट परीक्षेचा निकाल (SET EXAMINATION RESULT)जाहीर करताना त्यात मराठा आरक्षणाचा अंतर्भाव करावा(Maratha reservation should be included),अशी मागणी काही विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे केली आहे.त्यावर विद्यापीठ प्रशासनाकडून  यावर राज्य शासनाचा अभिप्राय घेतला जाणार आहे.त्यानंतरच सेट परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे.त्यामुळे सेट परीक्षेचा निकाल मराठा आरक्षण अंमलबजावणीत अडकला असल्याचे बोलले जात आहे.

महाराष्ट्र व गोवा राज्यात विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात आलेल्या सेट परीक्षेसाठी 1 लाख 28 हजार 243 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.त्यातील 1 लाख 9 हजार 154 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात परीक्षा दिली.आता निकाल केव्हा जाहीर होणार ? या प्रतीक्षेत विद्यार्थी आहेत.विद्यापीठाची निकालाची तयार अंतिम टप्प्यात आहे.मात्र, विद्यापीठाच्या सेट विभागाकडे विद्यार्थ्यांनी लेखी पत्रव्यवहार केला आहे.त्यात सेट परीक्षेचा निकाल मराठा आरक्षण अंतर्भूत करून जाहीर करावा,अशी मागणी केली आहे.

विद्यापीठातर्फे सेट परीक्षेची जाहिरात प्रसिध्द करताना लागू असलेल्या आरक्षणानुसार दरवेळी निकाल जाहीर केला जातो.विद्यापीठाने येत्या 31 मे पर्यंत निकाल जाहीर करण्याची तयारी केली आहे.मात्र,विद्यार्थ्यांकडून मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करून निकाल जाहीर करावा,अशी मागणी झाल्याने विद्यापीठापुढे पेच निर्माण झाला आहे.त्यामुळेच विद्यापीठाने शासनाकडून अभिप्राप्य घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

------------------------------------------------

शासन निर्णयानुसार विविध पद भरतीमध्ये मराठा आरक्षण लागू करण्यात आले आहे.त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी सेट परीक्षेचा निकाल जाहीर करताना मराठा आरक्षणाचा अंतर्भाव करावा,अशी मागणी लेखी स्वरूपात विद्यापीठाकडे केली आहे.त्यावर विद्यापीठाने शासनाकडे अभिप्राय मागितला आहे.शासनाकडून प्राप्त होणाऱ्या निर्देशानुसार निकालाबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
- डॉ. विजय खरे, प्रभारी कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ