Agriculture Admission : विद्यार्थ्यांचा ओढा कायम, सोळा हजार जागांसाठी २३ हजार विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी

राज्यात शासकीय व खासगी अनुदानित कृषी महाविद्यालयांमध्ये एकूण ३ हजार ३६२ एवढी प्रवेश क्षमता आहे. तर खासगी महाविद्यालयांमध्ये १२ हजार ६९० जागा आहेत.

Agriculture Admission : विद्यार्थ्यांचा ओढा कायम, सोळा हजार जागांसाठी २३ हजार विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी
Agriculture Admission Procees

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्य सीईटी सेलकडून (CET Cell) राज्यातील कृषी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी (Agriculture Admission) अंतरिम गुणवत्ता यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. या यादीमध्ये जवळपास २३ हजार विद्यार्थ्यांचा (Students) समावेश करण्यात आला आहे. प्रत्यक्षात राज्यात विविध अभ्यासक्रमांच्या १६ हजार जागाच उपलब्ध आहेत. एकीकडे इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या (Vocational Courses) जागा रिक्त राहत असताना कृषी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक अर्ज आल्याने विद्यार्थ्यांचा ओढा कायम असल्याचे स्पष्ट दिसते.

राज्यात शासकीय व खासगी अनुदानित कृषी महाविद्यालयांमध्ये एकूण ३ हजार ३६२ एवढी प्रवेश क्षमता आहे. तर खासगी महाविद्यालयांमध्ये १२ हजार ६९० जागा आहेत. अशा एकूण १६ हजार ५२ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. नुकतेच चार महाविद्यालयांना मान्यता मिळाल्याने काही प्रमाणात आणखी जागा वाढणार आहेत. सीईटी सेलने प्रवेश प्रक्रिया सुरू केल्यानंतर या महाविद्यालयांना मान्यता मिळाली आहे.

मुंबई, पुण्यासह राज्यातील ६६ महाविद्यालयांतील सहायक प्राध्यापकांच्या भरतीला मान्यता

सीईटी सेलने मंगळवारी सायंकाळी प्रवेशाची अंतरिम गुणवत्ता यादी प्रसिध्द केली. त्यामध्ये २२ हजार ९४६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यामुळे यंदाही प्रवेशासाठीचे कटऑफ चढेच राहणार असल्याचे दिसते. प्रत्यक्षात जवळपास २७ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. पण कागदपत्रांमध्ये त्रुटी तसेच इतर तांत्रिक कारणांमुळे या विद्यार्थ्यांचा गुणवत्ता यादीत समावेश झालेला नाही. या विद्यार्थ्यांची यादी तसेच त्रुटींची माहितीही प्रसिध्द करण्यात आली आहे.

दरम्यान, अंतरिम गुणवत्ता यादीवर विद्यार्थ्यांकडून हरकती मागविण्यात आल्या आहेत. त्यांना २७ जुलैपर्यंत हरकती नोंदविता येतील. त्याआधारे ३१ जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिध्द केली जाणार आहे. पहिल्या फेरीची महाविद्यालय निवड यादी २ ऑगस्ट रोजी प्रसिध्द होणार असून ३ ते ५ ऑगस्ट या कालावधीत महाविद्यालयात जाऊन प्रत्यक्ष प्रवेश घ्यावा लागणार आहे. तर दुसरी फेरी ७ ऑगस्ट पासून सुरू होणार आहे.  

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD