ऑस्ट्रेलियात शिकण्यासाठी बँकेत हवी एवढी रक्कम 

परदेशी विद्यार्थ्यांना व्हिसा देण्याच्या नियमांमध्ये ऑस्ट्रेलिया कडून मोठा बदल करण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलियात शिकण्यासाठी बँकेत हवी एवढी रक्कम 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

परदेशी विद्यार्थ्यांना व्हिसा देण्याच्या नियमांमध्ये ऑस्ट्रेलियाने (Australia)मोठा बदल केला आहे. त्यामुळे परदेशी विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियात शिकण्यासाठी व्हिसा (Visa to study in Australia)मिळणे पूर्वीपेक्षा थोडे कठीण झाले आहे. नव्या व्हिसा धोरणात (new visa policy)विद्यार्थ्याला ऑस्ट्रेलियात येण्यासाठी आवश्यक बचतीची रक्कम वाढवण्यात (Increase in amount of savings)आली आहे.

ऑस्ट्रेलियन सरकारने आता विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियातील राहण्याचा खर्च भगवण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त बचत करणे आवश्यक आहे, जे ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय किमान वेतनाच्या 75% असेल. परदेशी विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियन व्हिसासाठी पात्र होण्यासाठी किमान A$29,710 (₹16,29,964) ची बचत दाखवावी लागेल, हा नियम शुक्रवारपासून म्हणजेच 10 मे 2024 पासून लागू होईल.

ऑस्ट्रेलियन सरकारने बचतीची रक्कम वाढवण्याची गेल्या सात महिन्यांत ही दुसरी वेळ आहे. सरकारने याआधी ऑक्टोबरमध्ये ही रक्कम A$21,041 (₹11,54,361) वरून A$24,505 (₹13 लाख) केली होती. दरम्यान 2022 मध्ये कोविड-19 निर्बंध उठवल्यानंतर बरेच लोक ऑस्ट्रेलियात आले होते. त्यामुळे तेथे राहण्यासाठी भाड्याच्या घरांची कमतरता होती. या समस्येला तोंड देण्यासाठी सरकारने व्हिसाचे नियम कडक केले आहेत.