अधिसभा दोन दिवसांवर ; बजेटची हार्ड कॉप न मिळाल्याने सदस्यांमध्ये नाराजी, विद्यापीठाचे स्पष्टीकारण

बदललेल्या परिनियमानुसार नियोजित वेळेत सर्व माहिती अधिसभा सदस्यांना पाठवली असल्याचे विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितली जात आहे. 

अधिसभा दोन दिवसांवर ; बजेटची हार्ड कॉप न मिळाल्याने सदस्यांमध्ये नाराजी, विद्यापीठाचे स्पष्टीकारण

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे (Savitribai Phule Pune University)येत्या 23 मार्च रोजी अधिसभेची बैठक (senate meeting)आयोजित करण्यात आली असून त्यात 2024-25 या वर्षांचा अर्थसंकल्प मंजूरीसाठी सादर केला जाणार आहे.मात्र,अधिसभा दोन दिवसांवर आली तरी बजेटची हार्ड कॉपी (budget hard copy)अनेक सदस्यांना मिळालीच नाही.त्यामुळे अनेक सदस्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.विद्यापीठाने बजेटची सॉफ्ट कॉपी पाठवली होती.मात्र,बजेटची हार्ड कॉपी उशीरा मिळाल्याने सदस्यांना कट सूचनाच सादर करता आल्या नाहीत.परंतु, बदललेल्या परिनियमानुसार नियोजित वेळेत सर्व माहिती अधिसभा सदस्यांना पाठवली असल्याचे विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितली जात आहे. 

विद्यापीठाची अधिसभा ही विद्यापीठ अधिकार मंडळातील सर्वोच्च बॉडी आहे.अधिसभेत बजेट मंजूर झाल्याशिवाय विद्यापीठाला त्याची अंमलबजावणी करता येत नाही.त्यामुळे सदस्यांनी बजेट वाचून त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करणे अपेक्षित आहे.विद्यापीठाने सदस्यांना बजेटची सॉफ्ट कॉपी पाठवली असली तरी आजपर्यंत हार्ड कॉपी वाचूनच कट सूचना दिल्या गेल्या आहेत.तसेच बजेट सादर करण्यापूर्वी सुमारे आठ दिवस आधी कट सूचना सादर करण्याची परंपरा आहे.त्यामुळे अनेक अधिसभा सदस्य विद्यापीठाच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. 

विद्यापीठ अधिकार मंडळात चर्चा झाल्यानंतर बजेटमध्ये काही बदल सूचवले जाऊ शकतात.त्यानंतर बजेटला मंजूरी दिली जाणार आहे.मात्र तब्बल 277 पानांचे बजेट दोन दिवसांत हार्ड कॉपी मिळाल्यानंतर आणि ऑनलाईन कॉपी वाचणे शक्य नाही,विद्यापीठाने बजेटची हार्ड कॉपी लवकर पाठवणे अपेक्षित होते,अशी अपेक्षा आधिसभा सदस्य दादाभाऊ शिनलकर व गणपत नांगरे यांनी 'एज्युवार्ता'शी बोलताना व्यक्त केली.त्यात गणपत नांगरे म्हणाले, गुरूवारी सकाळपर्यंत मला बजेटची हार्ड कॉपी मिळाली नव्हती. 
-------------------

बदललेल्या परिनियमानुसार विद्यापीठाने सर्व अधिसभा सदस्यांना अधिसभेशी संबंधित सर्व माहिती नियोजित वेळेवर पाठवली आहे.सदस्यांना काट सूचना देण्यासाठी दोन दिवसांचा अवधी आहे. 
- डॉ.विजय खरे , प्रभारी कुलसचिव , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ