PM SHRI School : राज्यातील ५१६ शाळांची निवड; इथे पहा संपुर्ण यादी...

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या उपसचिव प्रीती मीना यांनी शुक्रवारी राज्याच्या शिक्षण विभागाचे सचिव रणजितसिंह देओल यांना पत्र पाठवून याबाबत माहिती दिली आहे.

PM SHRI School : राज्यातील ५१६ शाळांची निवड; इथे पहा संपुर्ण यादी...
PM Shree Schools declared

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

केंद्र सरकारच्या पीएम श्री शाळा (PM SHRI School) योजनेमध्ये पहिल्या टप्प्यात राज्यातील ५१६ शाळांची निवड कऱण्यात आली. त्यामुळे सर्व सरकारी शाळांचा (Government Schools) समावेश आहे. या शाळांमध्ये उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा, साधनसामुर्गी, आनंददायी शैक्षणिक वातावरण निर्मितीकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. त्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. (Selection of 516 schools in Maharashtra under PM Shri School Yojana)

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या उपसचिव प्रीती मीना यांनी शुक्रवारी राज्याच्या शिक्षण विभागाचे सचिव रणजितसिंह देओल (Ranjit Singh Deol) यांना पत्र पाठवून याबाबत माहिती दिली आहे. त्याअनुषंगाने राज्य सरकारला वार्षिक आराखडा तसेच बजेटचा प्रस्ताव तयार करण्यास सांगितले आहे. हा प्रस्ताव प्रोजेक्ट अप्रुवल बोर्डाच्या बैठकीत सादर करावा लागणार आहे.

हेही वाचा : आरटीई प्रवेशाच्या अडथळ्यांना सुरुवात ; एकाचवेळी १२ विद्यार्थ्यांचा प्रवेश नाकारला

पीएम श्री योजनेसाठी निवड झालेल्या ५१६ शाळांमध्ये ४२६ शाळा प्राथमिक, तर ९० शाळा या माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील आहेत. निधी वितरणासाठी राज्य सरकारला स्वतंत्र नोडल एजन्सी स्थापन करण्यास सांगण्यात आले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील उद्दिष्ट साध्य करण्यासाठी या योजनेचा फायदा होणार आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळणार आहे. देशभरातील जवळपास १५ हजार शाळांना या योजनेचा फायदा होणार आहे.

दरम्यान, PM SHRI School ही केंद्र पुरस्कृत योजना भारत सरकारने सन २०२२-२३ पासून सुरू केलेली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० मधील विविध तरतुदींची अंमलबजावणी करावयाची आहे. उत्कृष्ट पायाभूत भौतिक सुविधा, योग्य संसाधने, आनंददायी व उत्साहवर्धक शैक्षणिकदृष्ट्या अनुकुल वातावरण, उच्च दर्जाचे गुणात्मक शिक्षण देणाऱ्या सर्वसमावेशक, आदर्श शाळा विकसित करायच्या आहेत.

''पुणे जिल्ह्यातील या शाळांची निवड पीएम श्री योजनेसाठी झाल्यामुळे या शाळांना अत्याधुनिक भौतिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. या योजनेस पात्र झालेल्या शाळांना केंद्र शासनाकडून निधी मिळेल.त्यामुळे या शाळांच्या परिसरामधील मुलांना आता अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होतील. परिणामी शाळांच्या शैक्षणिक गुणवत्तेत अधिक भर पडेल.''

 - महेंद्र गणपुले ,प्रवक्ता ,मुख्याध्यापक संघ

पीएम श्री योजनेत पात्र ठरलेल्या पुण्यातील शाळांची यादी -

१) जिल्हा परिषद शाळा, अवसरी खुर्द नं १,आंबेगाव २) जिल्हा परिषद निरावागज शाळा बारामती ३) पुणे महानगरपालिका शाळा क्रमांक ५३, बी इंग्लिश, ४) जिल्हा परिषद खळद शाळा, पुरंदर ५) शिरूर नगरपालिका शाळा क्र. ५ मुंबई बाजार ६) जिल्हा परिषद भाडगाव शाळा, दौंड ७) लोणी काळभोर जिल्हा परिषद शाळा क्र. २ हवेली ८) भांडगाव जिल्हा परिषद शाळा, इंदापूर, ९) भोरवाडी जिल्हा परिषद शाळा ,जुन्नर १०) टाकळकरवाडी जिल्हा परिषद शाळा, खेड ११) जिल्हा परिषद शाळा चांदखेड, मावळ १२) बारामती नगरपालिका शाळा, श्रीरामनगर , बारामती १३) जिल्हा परिषद शाळा सारोळे भोर, १४) डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालय, जुन्नर १५) भगत इंग्लिश स्कूल, कॅन्टोन्मेंट बोर्ड ,खडकी १६) जिल्हा परिषद मंचर शाळा क्रमांक १, मंचर नगरपंचायत, १७) जिल्हा परिषद राजगुरुनगर शाळा क्रमांक १ मुले, राजगुरुनगर नगरपालिका शाळा, १८) संत नामदेव महाराज विद्यालय शाळा क्रमांक ५ सासवड नगरपालिका १९) जिल्हा परिषद शाळा जातेगाव बुद्रुक ,शिरूर २०) संत ज्ञानेश्वर प्री स्कूल, शाळा क्रमांक ६ तळेगाव दाभाडे, २१) जिल्हा परिषद हाय. प्रायमरी वेल्हे बुद्रुक, वेल्हे

राज्यातील शाळांची यादी खालीलप्रमाणे -