Assembly Session News : काय सांगता ! मुंबईतील सरकारी शाळेत एका विद्यार्थ्यांवर १ लाख २ हजार रुपये खर्च

Mumbai Municipal Education Budget : तरी शाळाबाह्य मुले का ?

Assembly Session News : काय सांगता ! मुंबईतील सरकारी शाळेत एका  विद्यार्थ्यांवर  १  लाख २  हजार रुपये खर्च
Out of School Children Survey

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क : 

 Out of School Children Survey : राज्यामध्ये फक्त 15 दिवसांच्या सर्वेक्षणात 3 हजार 114 मुल शाळाबाह्य सापडली. त्यात फक्त एकट्या मुंबई शहरात 15 दिवसांमध्ये 365 मुले शाळाबाह्य सापडली आहेत. या विषयावरुन हिवाळी अधिवेशनात (Assembly Session) जोरदार चर्चा झाली. मुंबई महापालिका (Mumbai Municipal Education Budget) प्रती विद्यार्थ्यामागे 1 लाख, 2 हजार रुपये खर्च करते. तरीही शाळाबाह्य मुले का ? असा प्रश्न विधानसभेत उपस्थित झाला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा मुद्दा उपस्थित केला. फक्त 15 दिवसाच्या सर्वेक्षणात 3 हजारांवर मुले शाळाबाह्य आढळली आहेत. संपूर्ण राज्यात नीट सर्वेक्षण केले तर किती निघतील ? असा सवालही त्यांनी केला.

हेही वाचा : देशात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ : सुमारे दोन कोटी विद्यार्थिनी घेत आहेत शिक्षण

''मुंबई सारख्या शहरामध्ये 355 बालके शाळाबाह्य आढळून आली आहेत. मुंबई महापालिकेचे शिक्षणासाठीचे बजेट 3 हजार, ३४७ कोटी असून प्रती विद्यार्थ्यामागे आपण रुपये 1 लाख 2 हजार रुपये खर्च करत आहोत. खासगी शाळांपेक्षा अधिक खर्च करूनही 365 मुले शाळाबाह्य का ?' ' असा प्रश्न विधानसभेत उपस्थित करून भाजप नेते व मुंबई शहर अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी चौकशीची मागणी केली. त्यावर शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी चौकशीचे आश्वासन दिले. 

तर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी फक्त 3 हजार मुले शाळाबाह्य म्हणणे चुकीचे आहे. त्याचे फेरसर्व्हेक्षण करणार आहे काय ? असा सवाल केला. त्यावर 17 ऑगस्ट ते 31 ऑगस्टपर्यंत शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण केले असता राज्यात 1 हजार 624 मुले व 1 हजार 590 मुले अशी एकूण 3 हजार 214 मुले शाळाबाह्य आढळल्याचे लेखी उत्तर मंत्री केसरकर यांनी सभागृहात साद केले. त्यावर अनेक सदस्यांनी आक्षेप घेतले.