Balbharati : दहावीच्या विद्यार्थ्यांनो, सुट्टीत अभ्यासाची चिंता सोडा, इथे घरबसल्या शिका!

शासकीय सुट्टीचा दिवस वगळून दररोज सकाळी ८ ते ११ या वेळेत हे वर्ग भरणार आहेत. एका विषयासाठी ४० मिनिटांचा वेळ देण्यात आला असून चार विषयांचे मार्गदर्शन मिळणार आहे.

Balbharati : दहावीच्या विद्यार्थ्यांनो, सुट्टीत अभ्यासाची चिंता सोडा, इथे घरबसल्या शिका!
Balbharati Virtual Class

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

इयत्ता दहावी (SSC) म्हटले की विद्यार्थी पालकांसह शिक्षक आणि संपूर्ण शाळेलाच टेन्शन. त्यामुळे नववीचा निकाल (Result) लागताच अनेक शाळांमध्ये, खाजगी क्लासेसमध्ये (Private Classes) दहावीचे वर्ग सुरू होतात. यामध्ये बालभारती (Balbharati) तरी कशी मागे राहील. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) सहकार्याने बालभारतीने उन्हाळ्याच्या सुट्टीत दहावीत गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी व्हर्च्यूअल क्लासेस घेण्यास सुरूवात केली आहे. त्याचा लाखो विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.

बालभारतीकडून व्हर्च्यूअल क्लासेसच्या (Virtual Classes) माध्यमातून दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. दि. २ मेपासून या वर्गांना सुरूवात झाली असून १० जूनपर्यंत सुरू राहणार आहे. या कालावधीत मराठी, इंग्रजी, हिंदी, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल व संस्कृत हे विषय शिकविले जाणार आहेत. इयत्ता नववीतून दहावीमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनातील असणारी भीती घालवण्यासाठी तसेच विविध विषयांची ओळख, संकल्पना, कृतिपत्रिका आराखडा ओळख व्हावी, शाळा सुरू होण्यापूर्वीच त्यांना संबंधित विषयातील पायाभूत ज्ञान मिळावे, या उद्देशाने हे क्सासेस घेतले जात आहेत.

हेही वाचा : ऐकावं ते नवलच! गाण्यांच्या चालीवर पाठ करा गणिताची सूत्र; भांडारकर गुरूजींचा अनोखा फंडा

शासकीय सुट्टीचा दिवस वगळून दररोज सकाळी ८ ते ११ या वेळेत हे वर्ग भरणार आहेत. एका विषयासाठी ४० मिनिटांचा वेळ देण्यात आला असून चार विषयांचे मार्गदर्शन मिळणार आहे. प्रत्येक विषयातील विविध संकल्पना किंवा घटक त्या विषयाती तज्ज्ञ शिक्षक शिकविणार आहेत. उदा. पहिल्या दिवशी म्हणजे दोन मे रोजी मराठी विषयाची कृतीपत्रिक आराखडा यावर नंदा भोर यांनी मार्गदर्शन केले. तर दुसऱ्यादिवशी जगदीश पाटील यांनी गद्य आकलन, कृती व स्वमत याविषयी मांडणी केली.

शनिवारी शीतल सामंत या निबंध लेखनाविषयी मार्गदर्शन करणार आहेत. अशाचप्रकारे प्रत्येक विषयातील विविध मुद्यांवर तज्ज्ञ शिक्षक मार्गदर्शन करणार आहेत. राज्यभरातील अनेक शाळांमधील विद्यार्थी या व्हर्च्यूअल क्लासमध्ये सहभागी होत आहेत. त्याचप्रमाणे बालभारतीच्या यु ट्यूब चॅनेलवरही हे व्हिडीओ पाहता येणार आहेत. त्यामुळे उन्हाळी सुट्टीच्या वर्गात शिकवलेले समजले नाही किंवा पाहता आले नाही, तर चॅनेलवरील व्हिडीओतून सर्व माहिती मिळू शकते.

बालभारतीचा यूट्यूब चॅनेल - https://youtube.com/@msbtebalbharati

व्हर्च्यूअल क्लासेसचे सविस्तर वेळापत्रक पुढीलप्रमाणे -