MPSC : आयोगाकडून काळ्या यादीत टाकलेल्या ८३ जणांची नावे जाहीर, वाचा सर्व विद्यार्थ्यांची नावे

आयोगाने जाहीर केलेल्या यादीनुसार ७९ जणांना कायमस्वरुपी प्रतिरोधित करण्यात आले आहे. तर चौघांना पाच वर्षांसाठी प्रतिरोधित करण्यात आले आहे.

MPSC : आयोगाकडून काळ्या यादीत टाकलेल्या ८३ जणांची नावे जाहीर, वाचा सर्व विद्यार्थ्यांची नावे
MPSC BlackList

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी प्रतिरोधित करण्यात आलेल्या उमेदवारांची काळी यादी (MPSC Blacklist) जाहीर करण्यात आली आहे. या यादीत २०११ मध्ये घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदासाठीच्या परीक्षेपासूनच्या ८३ उमेदवारांची नावे आहेत. जुलै २०२२ मधील पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय मुख्य परीक्षेपर्यंतची ही यादी आहे. (Maharashtra Public Service Commission)

आयोगाने जाहीर केलेल्या यादीनुसार ७९ जणांना कायमस्वरुपी प्रतिरोधित करण्यात आले आहे. तर चौघांना पाच वर्षांसाठी प्रतिरोधित करण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांना या कालावधीत आयोगाकडून घेण्यात येणारी एकही परीक्षा या उमेदवारांना देता येणार नाही.

इयत्ता अकरावीची दुसरी निवड यादी जाहीर; प्रवेश निश्चित करण्यासाठी महत्वाच्या टीप्स

परीक्षा कालावधीत गैरप्रकार केल्याप्रकरणी तसेच विविध कारणांसाठी आयोगाकडून उमेदवारांवर बंदी घातली जाते. आयोगाने प्रसिध्द केलेल्या काळ्या यादीमध्ये सर्वाधिक उमेदवार हे २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या कर सहायक परीक्षेतील आहेत.

त्याचप्रमाणे राज्यसेवा पूर्व परीक्षा, लेखनिक, टायपिस्ट, सहायक मोटार वाहन निरीक्षक, राज्य कर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा आदी परीक्षांमधील उमेदवारांचा काळ्या यादीत समावेश करण्यात आहे. पाच वर्षांसाठी प्रतिरोधित करण्यात आलेल्या चार उमेदवारांना त्यांचा कालावधी संपल्यानंतर पुन्हा परीक्षा देता येतील.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रतिरोधित केलेल्या विद्यार्थ्यांची काळी यादी -