आगीत होरपळणाऱ्या मणिपूरमध्ये अडकले महाराष्ट्रातील २२ विद्यार्थी; शिंदे सरकार लागले कामाला

मणिपूरमध्ये सुरु असलेल्या दंगलीमुळे तिथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दूरध्वनीवरुन संपर्क साधला.

आगीत होरपळणाऱ्या मणिपूरमध्ये अडकले महाराष्ट्रातील २२ विद्यार्थी; शिंदे सरकार लागले कामाला
Manipur Violence Representaive image

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

Manipur Violence : मणिपूर राज्य सध्या धुमसत असून हिंसाचाराच्या आगीत होपळत आहे. या हिंसाचारात आतापर्यंत सुमारे ५० जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हिंसाचार भडकवणाऱ्यांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या राज्यात महाराष्ट्रातील (Maharashtra) सुमारे २२ विद्यार्थी अडकले आहेत. बहुतेक विद्यार्थी आयआयटी (IIT) आणि एनआयटीमध्ये (NIT) शिक्षण घेत असून त्यांना परत आणण्यासाठी शिंदे सरकारने तातडीने पावले उचलली आहे. (22 students from Maharashtra are stuck in Manipur which is engulfed in fire)

मणिपूरमध्ये सुरु असलेल्या दंगलीमुळे तिथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज दूरध्वनीवरुन संपर्क साधला. विकास शर्मा व तुषार आढाव या दोन विद्यार्थ्यांशी ते बोलले. याविषयी माहिती देताना शिंदे म्हणाले, विद्यार्थ्यांनी बोलताना ते घाबरले असल्याचे दिसले. त्यांना त्यांना दिलासा देऊन सर्वतोपरी मदतीची ग्वाही दिली.

हेही वाचा : आयटीआय विद्यार्थ्यांसाठी खुशखबर; मंत्री लोढा यांच्याकडून विद्यावेतनाची घोषणा

अडकलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली असून लवकरच हे विमान अडकलेल्या सुमारे २२ विद्यार्थ्यांना घेऊन महाराष्ट्रात दाखल होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यासंदर्भात राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी देखील मणिपूरच्या मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांशी संपर्क साधून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची विनंती करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. राज्य शासन मणिपूरमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान, आरक्षणाच्या मुद्यावरून काही दिवसांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला आहे. त्यामुळे राज्यात तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या अनेक भागांमध्ये निर्बंध लादण्यात आले आहेत. सध्या हिंसक परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला जात असला तरी परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे शक्य होत नाही. परिणामी, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2