‘एआयएसएसएमएस’च्या सहा अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांना ‘एनबीए’ मानांकन

अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रामध्ये राष्ट्रीय स्तरावर एनबीए मूल्यांकनास फार महत्व आहे.

‘एआयएसएसएमएस’च्या सहा अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांना ‘एनबीए’ मानांकन
AISSMS Engineering College

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रेडिटेशन (NBA) मूल्यांकन समितीने ‘एआयएसएसएमएस’ अभियांत्रिकी महाविद्यालयास (AISSMS Engineering College) नुकतीच भेट दिली होती. या भेटी दरम्यान समितीने अभियांत्रिकी महाविद्यालयामधील शैक्षणिक दर्जा तसेच सर्व सोयी-सुविधांची सत्यता पडताळुन संगणक अभियांत्रिकी (Computer Engineering), स्थापत्य अभियांत्रिकी, रसायन अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, यंत्र अभियांत्रिकी व  यंत्र  सँडविच अभियांत्रिकी या सहा ही अभ्यासक्रमांना पुढील तीन शैक्षणिक वर्षांकरिता अधिस्वीकृती मान्यता दिली. (NBA Accreditation)

अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रामध्ये राष्ट्रीय स्तरावर एनबीए मूल्यांकनास फार महत्व आहे. एआयएसएसएमएस अभियांत्रिकी महाविद्यालयामधील सहा विभागांना मानांकन मिळाल्यामुळे या अभ्यासक्रमांची गुणवत्ता अधोरेखित झाली आहे.

जागतिक बँकेकडून देशातील तंत्रशिक्षण संस्थांना २५५.५ दशलक्ष डॉलरचे कर्ज

एआयएसएसएमएस अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय बोरमणे, एनबीए समन्वयक डॉ. मंगेश फाटे, सर्व विभाग  प्रमुख, सर्व विभागाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी एनबीए मानांकन मिळविण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

एआयएसएसएम सोसायटीचे मानद सचिव मालोजीराजे छत्रपती,  सहसचिव सुरेश शिंदे, खजिनदार अजय पाटील, चेअरमन, गव्हर्निंग कौन्सिल विश्वासराव पाटील, चेअरमन व्यवस्थापकीय समिती भगवानराव साळुंखे व इतर पदाधिकारी यांनी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, माझी विद्यार्थी व पालकाचे अभिनंदन केले. 

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2