विद्यार्थ्यांनो, लागा तयारीला! विद्यापीठाच्या ‘युवक महोत्सवा’चे पडघम

महोत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थी कलावंतांना आगामी राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय युवक महोत्सवासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संघात समावेश करण्यासाठी प्राधान्याने विचार केला जाणार आहे

विद्यार्थ्यांनो, लागा तयारीला! विद्यापीठाच्या ‘युवक महोत्सवा’चे पडघम
SPPU Youth Festival

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) विद्यार्थी विकास मंडळामार्फत ‘स्वररंग-२०२३’ या विभागीय युवक महोत्सवाचे (SPPU Youth Festival) आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाशी संलग्न सहा महाविद्यालयांमध्ये दि. २५ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधी हा महोत्सव रंगणार आहे. त्यासाठी दि. २२ सप्टेंबरपर्यंत संबंधित महाविद्यालयांपैकी कोणत्याही एका महाविद्यालयात प्राथमिक नोंदणी करणे आवश्यक आहे.

 

महोत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थी कलावंतांना आगामी राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय युवक महोत्सवासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संघात समावेश करण्यासाठी प्राधान्याने विचार केला जाणार आहे. कोणत्याही एका आयोजक महाविद्यालयातील युवक महोत्सवात महाविद्यालयांनी आपला संघ पाठवावा, असे आवाहन विद्यापीठामार्फत करण्यात आले आहे.

SPPU News : विद्यापीठाशी संलग्न ४० महाविद्यालये 'नॅक'कडे फिरकलीच नाहीत!

 

खडकीतील (पुणे) टिकाराम जगन्नाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दि. २५ सप्टेंबर, संगमनेरमधील (अहमदनगर) अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २६ सप्टेंबर, नाशिकमधील के. टी. एच. एम. महाविद्यालयात दि. २७ सप्टेंबर, बारामतीतील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात दि. २९ सप्टेंबर, पुणे शहरातील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात दि. ३० सप्टेंबर आणि पुण्यातील लोणीकंद येथील श्री. रामचंद्र अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. ३ ऑक्टोबर रोजी युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

विभागीय युवक महोत्सवातून निवडलेल्या विद्यार्थ्यांचा विद्यापीठस्तरीय युवक महोत्सव ऑक्टोबर महिन्यातील पहिल्या आठवड्यामध्ये घेण्यात येणार आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. अभिजीत कुलकर्णी यांनी दिली.

 

दरम्यान, विभागीय युवक महोत्सवामध्ये सुगम गीत, समूह गीत, लोक वाद्यवृंद, शास्त्रीय नृत्य, नकला, वक्तृत्व स्पर्धा, एकपात्री अभिनय, स्थळ चित्र, रांगोळी, मेहंदी, मांडणी कला, पोस्टर मेकिंग, व्यंगचित्र, स्थळ छायाचित्रण, माती कला, एकांकिका, लोक नृत्य, पाश्चिमात्य वैयक्तिक गीत, भारतीय ताल वाद्य वादन यांसह २९ कलाप्रकारांचा समावेश करण्यात आला आहे.

 

युवक महोत्सवाविषयी अधिक माहितीसाठी लिंक - https://tinyurl.com/4r5hjhzb

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j