स्ट्रगल शिवाय यश नाही ; पेशन्स ठेवायला हवेत : नागराज मंजुळे यांचे वाडिया कॉलेज मधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

नवरोसजी वाडिया महाविद्यालयाला ९० वर्षे पूर्ण होत असल्याच्या त्यानिमित्ताने 'नवरोस २३ ' या ग्रॅन्ड सांस्कृतिक कार्यक्रमाचे सात दिवस आयोजन

स्ट्रगल शिवाय यश नाही ; पेशन्स ठेवायला हवेत : नागराज मंजुळे यांचे वाडिया कॉलेज मधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
स्ट्रगल शिवाय यश नाही ; पेशन्स ठेवायला हवेत : नागराज मंजुळे यांचे वाडिया कॉलेज मधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

     कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी सुरुवातीला कष्ट आणि स्ट्रगल struggle करावाच लागतो. मराठी चित्रपट सृष्टीतही Marathi film industry स्ट्रगलला पर्याय नाही. अनेकांना कधी यश तर कधी अपयश येते पण प्रत्येकाने पेशन्स ठेवायला हवेत, असे मत प्रसिद्ध अभिनेता व दिग्दर्शक नागराज मंजुळे actor and director Nagraj manjule यांनी वाडिया महाविद्यालयातील Wadia College कार्यक्रमात व्यक्त केले.या कार्यक्रमाला 'घर बंदूक बिरयाणी' Ghar banduk biryani  चित्रपटाच्या कलाकारांनी उपस्थिती लावली.तसेच अभिनेता आकाश ठोसर Aakash thosar , अभिनेत्री सायली पाटील sayali Patil यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांचा उत्साह वाढवला. 

     नवरोसजी वाडिया महाविद्यालयाला ९० वर्षे पूर्ण होत असल्याच्या त्यानिमित्ताने 'नौरोस २३ ' या ग्रॅन्ड सांस्कृतिक कार्यक्रमाचे सात दिवस आयोजन करण्यात आले होते. मशाल रॅली काढून 'नौरोस या ग्रॅन्ड कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यावेळी नागराज मंजुळे बोलत होते. अभिनेता आकाश ठोसर  अभिनेत्री सायली पाटील यांच्यासह मंगेश कुलकर्णी, गार्गी कुलकर्णी, दीप्ती देवी तसेच महाविद्यालयाचे विश्वस्त सचिन सानप, अशोक चांडक , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत चाबुकस्वार, डॉ.वृषाली रणधीर ,उपप्राचार्य समीना बॉक्सवाला,डॉ.भारत बहुले, अशोक मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ऋषी परदेशी आदी उपस्थित होते. 

नागराज मंजुळे यांच्यासह प्रसिद्ध कलाकारांसमोर नृत्य व इतर कला सादर करताना महाविद्यालयाचे विद्यार्थी भारावून गेले. तसेच महाविद्यालयातील सांस्कृतिक कार्यक्रमाचा भाग होता आले याबद्दल नागराज मंजुळे व आकाश ठोसर यांनी आनंद व्यक्त केला. महाविद्यालयाच्या विविध विभागांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मायबोली, लिटरिया, ब्युटीफूल माईंड,केम फेस्ट आधी कार्यक्रमातून विविध कला सादर केल्या.