गणेश गुसिंगेने वनविभागाचा पेपरही फोडला? पोलिसांना सापडले पुरावे

सध्या विविध भरती परीक्षा वादात अडकल्या आहेत. वैद्यकीय शिक्षण विभाग, पोलीस भरती, तलाठी भरती आणि आता वन विभागाची परीक्षाही वादात सापडण्याची चिन्हे आहेत.

गणेश गुसिंगेने वनविभागाचा पेपरही फोडला? पोलिसांना सापडले पुरावे

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

Maharashtra Recruitment : तलाठी भरती (Talathi Bharti) परीक्षेतील मुख्य आरोपी असलेल्या गणेश गुसिंगेने (Ganesh Gusinge) वनविभागाचा (Forest Department) पेपरही फोडला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नाशिक पोलिसांना (Nashik Police) गुसिंगेच्या मोबाईलमध्ये वन विभागाच्या परीक्षेची प्रश्नपत्रिकाही आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याबाबत वन विभागाकडे पाठपुरावा सुरू केला असून लवकरच चित्र स्पष्ट होईल.

सध्या विविध भरती परीक्षा वादात अडकल्या आहेत. वैद्यकीय शिक्षण विभाग, पोलीस भरती, तलाठी भरती आणि आता वन विभागाची परीक्षाही वादात सापडण्याची चिन्हे आहेत. काही दिवसांपूर्वीच वन विभागाची परीक्षा झाली आहे. या परीक्षेदरम्यानही काही गैरप्रकार झाल्याचे समोर आले होते. पण आता गुसिंगेचाही यात सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

...हे अतिशय गंभीर! पराग काळकर यांच्या नियुक्तीवर विजय वडेट्टीवार यांचा आक्षेप

आरोपी गणेश गुसिंगे हा म्हाडा आणि पिंपरी चिंचवड पोलीस भरती घोटाळ्यातीलही आरोपी आहे. पण अनेक दिवस फरार होता. त्याच्यावर गुन्हेही दाखल आहेत. अखेर तलाठी भरती प्रक्रियेत हायटेक कॉपी प्रकरणी नाशिक पोलिसांनी त्याला पकडले. त्यानंतर अनेक धक्कादायक प्रकार समोर येऊ लागले आहेत.

नाशिक पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये गुसिंगेच्या मोबाईलमध्ये वनविभागाच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका आढळून आली आहे. याबाबत नाशिक पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी माहिती दिली. गुसिंगे याच्या मोबाईलमध्ये वनविभागाच्या प्रश्नपत्रिका आढळल्या असून त्याने इतर परीक्षेत देखील गैरव्यवहार केल्याचे दिसते. वन विभागाकडून याबाबत माहिती घेतली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

वैद्यकीय परीक्षेत १३८ गुण

गणेश गुसिंगे याने वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडून (डीएमइआर) काही महिन्यांपूर्वी घेण्यात आलेली परीक्षा दिली होती. या परीक्षेत गुसिंगे याला १३८ गुण मिळाले असून उत्तीर्ण झाला आहे. त्यावरून आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. सोशल मीडियात याबाबत प्रतिक्रिया उमटत आहेत. या परीक्षेतही त्याने गैरप्रकार केला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo