NTA ने दिला अलर्ट : मतदानाची शाई बोटावर असल्यास NTA ची कोणतीही परीक्षा देता येणार नाही ? 

लोकसभा 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत जे मतदान करतील आणि ज्यांच्या बोटांना शाई लागली असेल त्यांना  NTA द्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या परीक्षांसाठी परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. या मेसेज मुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

NTA ने दिला अलर्ट : मतदानाची शाई बोटावर असल्यास NTA ची कोणतीही परीक्षा देता येणार नाही ? 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 NEET UG 2024, CUET UG 2024, JEE Mains किंवा नॅशनल टेस्टिंग एजन्सीला (National Testing Agency-NTA) द्वारे घेतली जाणारी इतर कोणतीही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी NTA कडून अलर्ट जारी करण्यात आला आहे.ज्याचा परिणाम देशातील 50 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांवर वेळी होईल. त्यामुळे एनटीएने याबाबत खुलासा केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर असे अनेक मेसेज पसरवले जात आहेत, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की लोकसभा 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत जे मतदान करतील आणि ज्यांच्या बोटांना शाई लागली असेल त्यांना  NTA द्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या परीक्षांसाठी परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. या मेसेज मुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, ही माहिती खरी आहे की खोटी याचे स्पष्टीकरण आता NTA ने स्वत: दिले आहे.

NTA ने स्पष्ट केले आहे की,  " नॅशनल टेस्टिंग एजन्सीला अशी बातमी मिळाली आहे की, "सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की लोकसभा 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत जे मतदान करतील आणि ज्यांच्या बोटांना शाई लागली असेल त्यांना  NTA द्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या परीक्षांच्या  परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही." मात्र हा संदेश पूर्णपणे मूर्खपणाचा आहे. याला कोणताही आधार नाही. NTA ने अशी कोणतीही मार्गदर्शक तत्वे जारी केलेली नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अशा अफवांकडे लक्ष देऊ नये व मतदानाचा हक्क बजावावा, मतदानामुळे परीक्षेसाठी तुमच्या पात्रतेवर कोणताही फरक पडणार नाही.' असे एनटीएने स्पष्ट केले आहे.तसेच एजन्सीने उमेदवारांना त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करून आगामी परीक्षेची तयारी करण्याचा सल्ला दिला आहे.