डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू पदी कोण? १९ डिसेंबरला मुलाखती; अंतिम पाच ठरले 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील दोन उमेदवारांचा समावेश आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू पदी कोण? १९ डिसेंबरला मुलाखती; अंतिम पाच ठरले 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या (Dr.Babasaheb Ambedkar Marathwada University) कुलगुरू (vice chancellor) पदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या त्यातून पाच अंतिम उमेदवारांचे निवड (Selection of five finalists) करण्यात आली आहे.त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Savitribai Phule Pune University) दोन उमेदवारांचा समावेश आहे.येत्या १९ डिसेंबर रोजी मुंबई येथे अंतिम पाच उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत.त्यातून एका व्यक्तीची निवड कुलगुरूपदी केले जाणार आहे.

हेही वाचा : शिक्षण पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांना प्लॅगारिझम सॉफ्टवेअरचा रिपोर्ट बंधनकारक ; काय आहे नवीन नियम

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कुलगुरू पदाच्या मुलाखतीसाठी निवडलेल्या २४ पात्र उमेदवारांपैकी काही उमेदवारांच्या निवडीवर उलटसुलट चर्चा झाल्या . मात्र, तरीही २९ नोव्हेंबर रोजी मुंबईत सर्व उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले. मुलाखतीसाठी निवडलेल्या २४ उमेदवारांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर, भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.संदेश जाडकर, बायोटेक्नॉलॉजी विभागाचे डॉ.राजू गच्छे, भौतिकशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ.संजय ढोले, तसेच डॉ.विलास खरात यांचा समावेश होता. त्यातून डॉ.संजय ढोले व डॉ.विलास खरात यांची अंतिम पाच उमेदवारांच्या यादीत निवड झाली आहे. तसेच कोल्हापूर विद्यापीठाचे डॉ. विजय फुलारी यांचाही अंतिम पाचमध्ये समावेश असून बुधवारी (दि.६ ) सायंकाळी ५.३० वाजता त्यांना या तिघांना १९ डिसेंबर रोजी मुळाखातीस उपस्थित राहण्याबाबत इमेलद्वारे कळवण्यात आले आहे.दरम्यान, प्रा.राजेंद्र काकडे व ज्योती जाधव यांचे नावे अंतिम पाचमध्ये असल्याची चर्चा शिक्षण वर्तुळात सुरू आहेत.मात्र, त्याबाबत अधिकृत माहिती प्राप्त झाली नाही.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या बाबतही विविध आरोप करण्यात आले. त्यानंतर कुलगुरू पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांमध्ये काही वादग्रस्त व्यक्ती मुलाखतीसाठी निवडल्या गेल्याची चर्चा झाली. त्यामुळे कुलगुरू शोध समितीच्या कार्य पद्धतीवर शंका घेण्यात आली होती.मात्र, या सर्व घटनांनंतर औरंगाबाद विद्यापीठाच्या कुलगुरू पदी कोण विराजमान होणार ? याबाबत उत्सुकता आहे.