तलाठी भरतीमधील धाराशिव निवड यादीतील टॉपरला अटक 

धाराशिव जिल्हाधिकारी यांनी या घटनेची तक्रार पोलिसांकडे दिल्यानंतर सदर उमेदवारांवर गुन्हा दाखल करून अटक झाल्याची बातमी समोर आली आहे.

तलाठी भरतीमधील धाराशिव निवड यादीतील टॉपरला अटक 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यात गाजत असलेल्या तलाठी भरती (talathi recruitment) प्रक्रियेमध्ये सातत्याने नवनवीन घटना धक्कादायक घटना समोर येत आहेत. त्यातच आता धाराशिव (Dharashiva)येथे तलाठी भरतीच्या निवड यादीत टॉपर असलेल्या उमेदवारांना अटक करण्यात आली असल्याचा धक्कादायक दावा स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने (Competitive Examination Coordination Committee)केला आहे. आम्ही दिलेल्या पुराव्यांच्या आधारावर आणि तांत्रिक तपासानंतर संबंधित उमेदवारांनी गैरप्रकार केल्याचे समोर आले आहे. संपूर्ण तलाठी भरती भ्रष्टाचार झाल्याने सध्या नियुक्त देऊ नये, अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केली आहे.

राज्यातील तलाठी भरती प्रक्रियेत घोटाळा झाला असून त्याबाबतचे अनेक पुरावे स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने दिले आहेत. तसेच राज्यातील विविध जिल्ह्यात या संदर्भात अनेकांना अटक केली आहे. परीक्षा घेणाऱ्या आयबीपीएस कंपनीच्या कर्मचाऱ्यांबाबतही स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने गंभीर आरोप केले आहेत. एक्स (x) या सोशल मीडियावर स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने धक्कादायक माहिती प्रसिद्ध केली आहे.

स्पर्धा समन्वय समितीच्या म्हणण्यानुसार आम्ही धाराशिवचे  जिल्हाधिकारी सचिन उंबासे यांच्याकडे रीतसर तक्रार दिली होती.आम्ही दिलेल्या पुरावांच्या आधारे तांत्रिक तपासानंतर संबंधित उमेदवारांनी गैरप्रकार केल्याचे प्राथमिक रित्या समोर आले. पूर्ण तपास पोलीस करत आहेत. धाराशिव जिल्हाधिकारी यांनी या घटनेची तक्रार पोलिसांकडे दिल्यानंतर सदर उमेदवारांवर गुन्हा दाखल करून अटक झाल्याची बातमी समोर आली आहे. एनी डेस्क सारखे सॉफ्टवेअर वापरून हा घोटाळा करण्यात आला आहे. आता आम्ही फक्त धाराशिव जिल्ह्यातील उमेदवारांबाबत पुरावे दिले होते. पण इतर अनेक जिल्ह्यातील उमेदवारांबाबत आमच्याकडे पुरावे आहेत. संपूर्ण तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याने सध्या नियुक्त्या देऊ नयेत, सुरुवातीला न्यायालयीन चौकशी समिती समोर या घोटाळ्याचा तपास करावा, अशी आमची मागणी आहे,असेही एक्स (x) या सोशल मीडियावर नमूद करण्यात आले आहे.