SPPU News : वसतिगृहासाठी विद्यार्थी करणार बेमुदत आंदोलन, विकास मठेंच्या हकालपट्टीची मागणी

विद्यापीठातील विविध विभागांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना वसतिगृह न मिळाल्याने त्यांच्यावर विद्यापीठ सोडून जाण्याची वेळ आली. एका विद्यार्थ्याने तर वसतिगृह मिळत नसल्याने विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे आत्महत्येचे पत्र पाठविले.  

SPPU News : वसतिगृहासाठी विद्यार्थी करणार बेमुदत आंदोलन, विकास मठेंच्या हकालपट्टीची मागणी
SPPU

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (SPPU) विद्यार्थ्यांना वसतिगृह (University Hostel) उपलब्ध व्हावे, यांसह विविध प्रश्नांवर  विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या (Management Council) बैठकीत चर्चा करण्यात आली. परंतु, त्यावर सकारात्मक हालचाली न झाल्यामुळे विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीसह इतर समविचारी संघटनांनी येत्या ८ सप्टेंबर रोजी विद्यापीठात बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. (Students Protest in Savitribai Phule Pune University)

 

विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे सत्र थांबवण्यात विद्यापीठ प्रशासन केव्हा यशस्वी होणार?  असा प्रश्न उपस्थित होत आहे. विद्यापीठातील विविध विभागांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना वसतिगृह न मिळाल्याने त्यांच्यावर विद्यापीठ सोडून जाण्याची वेळ आली. एका विद्यार्थ्याने तर वसतिगृह मिळत नसल्याने विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे आत्महत्येचे पत्र पाठविले.

‘नॅक’ बाबत विद्यापीठांचे तोंडावर बोट! देवळाणकरांनी मागवली संलग्नता काढलेल्या महाविद्यालयांची यादी

विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत विद्यार्थी प्रश्नावर सविस्तर चर्चा झाली. विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाच्या प्रश्नात कुलगुरू स्वतः लक्ष राहणार असा निर्णय झाला. मात्र अजूनही वसतिगृहाचा प्रश्न न संपल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

 

प्रत्येक गरजू विद्यार्थ्याला वसतिगृह मिळालेच पाहिजे, वसतिगृह वाटप व कोटा वर्गीकरणांमध्ये गैरव्यवहारप्रकरणी वसतिगृह प्रमुख विकास मठे यांची हकालपट्टी करण्यात यावी, मुलींना धमकीप्रकरणी (ओएसडी) संगीता देशपांडे यांचीही हकालपट्टी करावी, या मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन केले जाणार असल्याचे विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीतर्फे कळविण्यात आले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j