SPPU News : विद्यापीठातील विद्यार्थी किती दिवस उपाशी राहणार?

विद्यापीठातील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार जेवण मिळावे, या मागणीसाठी विविध विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केले. मात्र, त्यात कोणतीही सुधारणा झाली नाही.

SPPU News : विद्यापीठातील विद्यार्थी किती दिवस उपाशी राहणार?

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (SPPU) विविध वसतिगृहातील मेस चालकांकडून निकृष्ट दर्जाचे जेवण विद्यार्थ्यांना दिले जात होते. त्यामुळे संबंधित मेसा चालकांचे कंत्राट संपुष्टात आणले जात असल्याची घोषणा तत्कालीन कुलसचिव प्रफुल्ल पवार (Prafulla Pawar) यांनी केली होती. या घटनेस सुमारे एक ते दीड महिना होऊन गेला. मात्र, अजूनही विद्यार्थ्यांना जेवण देण्यासाठी नवीन मेसा चालकाचा शोध घेतला गेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वयंसेवी संस्थांकडून दिल्या जाणाऱ्या खिचडीवरच अवलंबून राहायचे की उपाशी राहायचे, असा सवाल विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे. (Savitribai Phule University News)

 

विद्यापीठातील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार जेवण मिळावे, या मागणीसाठी विविध विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केले. मात्र, त्यात कोणतीही सुधारणा झाली नाही. विद्यार्थ्यांच्या जेवणात अळी, झुरळ निघत असल्याच्या घटना सातत्याने घडल्या. त्यामुळे सर्व विद्यार्थी संघटनांनी एकत्र येऊन विद्यापीठात आंदोलन केले. त्यावर मेस चालकाला तात्काळ काढून टाकण्याचे तत्कालीन कुलसचिव प्रफुल्ल पवार यांनी जाहीर केले. मात्र, अद्याप नवीन मेस चालक नियुक्त केला नाही. तसेच विद्यार्थ्यांना अजूनही निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत.

पीआरएन ब्लॉक विद्यार्थ्यांच्या परीक्षा 1 डिसेंबरपासून घेण्याचे नियोजन

 

विद्यापीठातर्फे मेस व रिफ्रेक्ट्रीसाठी पूर्वी ऑफलाईन निविदा प्रक्रिया राबवली जात होती. परंतु, आता ऑनलाईन निविदा मागविल्या जाणार आहेत. त्याची प्रक्रिया सुरू असली तरी निविदा काढून संबंधितांना प्रत्यक्ष काम देण्यास बराच कालावधी लागणार आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने ऑनलाईन निविदा मागवून लवकर सकस व दर्जेदार जेवण देणाऱ्या व्यक्तीची नियुक्ती करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.

 

ई टेंडरिंगची प्रक्रिया पूर्ण करा

विद्यापीठ प्रशासनाने लवकर ई टेंडरिंगची प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच बंद असलेले उपहारगृह तात्काळ सुरू करावेत.तेव्हाच विद्यार्थ्यांना दर्जेदार व सकस जेवण मिळू शकेल.

- तुकाराम शिंदे, विद्यार्थी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO