अभियांत्रिकीचे नियमबाह्य प्रवेश रद्द करा, अन्यथा न्यायालयात जाऊ; युवासेनेचा इशारा

पुणे व पिंपरी चिंचवडमधील अनेक महाविद्यालयांकडून संस्था स्तरावरील प्रवेश प्रक्रिया नियमबाह्य पध्दतीने होत असून त्यामध्ये आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचा आरोप यादव यांनी केला आहे.

अभियांत्रिकीचे नियमबाह्य प्रवेश रद्द करा, अन्यथा न्यायालयात जाऊ; युवासेनेचा इशारा

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

अभियांत्रिकी (Engineering) व विधी (Law) महाविद्यालयनिहाय संस्था स्तरावरील नियमबाह्य पध्दतीने केलेल्या प्रवेश प्रक्रियेबाबतचे (Admission Process) पुरावे समितीकडे सादर केले आहेत. पण त्यावर ठोस कारवाई होत नाही. सर्व नियमबाह्य प्रवेश तातडीने रद्द करावेत, अशी मागणी युवासेनेचे (Yuva Sena) राज्य सहसचिव कल्पेश यादव (Kalpesh Yadav) यांनी प्रवेश नियामक प्राधिकरणाकडे केली आहे. कारवाई न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही यादव यांनी दिला आहे.

 

प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यापासून पुणे व पिंपरी चिंचवडमधील अनेक महाविद्यालयांकडून संस्था स्तरावरील प्रवेश प्रक्रिया नियमबाह्य पध्दतीने होत असून त्यामध्ये आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचा आरोप यादव यांनी केला आहे. याबाबतचे पुरावेही प्राधिकरणाकडे सादर केले आहेत. त्यानुसार तंत्रशिक्षण विभागाच्या सहसंचालकांच्या अधिपत्याखाली दि. ३१ ऑगस्ट रोजी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली.

पीआरएन ब्लॉक विद्यार्थ्यांच्या परीक्षा 1 डिसेंबरपासून घेण्याचे नियोजन

 

समितीकडे सर्व महाविद्यालय निहाय संस्थास्तरावरील नियमबाह्य पध्दतीने केलेल्या प्रवेश प्रक्रियेबाबतचे पुरावे सादर केले आहेत. या समितीच्या अहवालाप्रमाणे, नियमाप्रमाणे प्रवेशांना मान्यता अथवा रदद् करण्याची विहित मुदत आता संपली असून अद्याप संबंधित महाविद्यालयांवर कारवाई झालेली नाही, अशी नाराजी यादव यांनी व्यक्त केली आहे.

 

आम्ही सादर केलेल्या ठोस पुराव्यांच्या अनुषंगाने आपण संस्थास्तरावर दिलेले सर्व नियमबाह्य प्रवेश तातडीने रद्द करावेत, अन्था शिक्षणातील हा भ्रष्टाचार थांबविण्यासाठी आम्हाला न्यायालयीन लढाई लढावी लागेल, असा इशारा यादव यांनी दिला आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO