शिक्षकांसाठी खुशखबर; केंद्रप्रमुख पदाच्या २ हजार ३८४ जागांसाठी होणार भरती, कोण आहे पात्र?

परीक्षा परिषदेकडून विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी ‘केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा – २०२३’ या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने जून २०२३ च्या शेवटच्या आठवड्यात आयोजन करण्यात येणार आहे.

शिक्षकांसाठी खुशखबर; केंद्रप्रमुख पदाच्या २ हजार ३८४ जागांसाठी होणार भरती,  कोण आहे पात्र?
Teachers Recruitment

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यातील सर्व जिल्हा परिषदेतील (Zila Parishad) प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर नियुक्त होण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून (MSEC) जून महिन्याच्या अखेरीस लेखी परीक्षा (Examnination) घेतली जाणार आहे. तब्बल २ हजार ३८४ जागांसाठी ही भरती होणार आहे. (Teachers Recruitment)

परीक्षा परिषदेकडून विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी ‘केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा – २०२३’ या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने जून २०२३ च्या शेवटच्या आठवड्यात आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन प्रणालीद्वारे दि. १५ जून २०२३ पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. या परीक्षेचे माध्यम, अभ्यासक्रम, पात्रता, अर्ज करण्याची कार्यपद्धती व कालावधी याबाबतची अधिसूचना परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, अशी माहिती परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी दिली.

SSC Exam : पुरवणी परीक्षेसाठी बुधवारपासून अर्ज भरता येणार; राज्य मंडळाची माहिती

राज्यातील ३४ जिल्ह्यांतील २ हजार ३८४ जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविली जाणार असून सर्वाधिक पदे पुणे जिल्ह्यात आहेत. प्राथमिक शिक्षकांना त्या-त्या जिल्ह्यासाठी अर्ज करू शकतात. त्यासाठीची लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची असेल. ही परीक्षा २०० गुणांची घेण्यात येणार आहे.

केंद्रप्रमुख पदासाठी पात्रता -

१. फक्त संबंधित जिल्हा परिषद मधील शाळेवर कार्यरत पात्र शिक्षक परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. संबंधित जिल्हा परिषदेव्यतिरिक्त जसे अन्य जिल्हा परिषद, न.प./ न. पा., म.न.पा., खाजगी संस्था मधील शिक्षक कर्मचारी परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत.

ITI Admission : ‘आयटीआय’मध्ये दीड लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश

२. जाहिरातीस अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्विकारण्याच्या अंतिम दिनांकास उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापिठाची बी.ए./ बी.कॉम./ बी.एस.सी. ही पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर (प्राथमिक) या पदावर तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा (शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे.

किंवा प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर नियुक्त शिक्षकांनी ज्या दिनांकास वरील प्रमाणे पदवी धारण केलेली आहे, त्या दिनांकापासून ३ वर्षांपेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा (शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे.

३. विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत कमाल वयोमर्यादा ५० वर्ष राहील.

४. विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवार ज्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असेल, त्याच जिल्हयासाठी पात्र राहतील..

 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे संकेतस्थळ : www.mscepune.in 

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo