‘स्टेट बँक ऑफ इंडिया’मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; असा करा अर्ज...

इच्छूक उमेदवारांना sbi.co.in या अधिकृत वेबसाईटवरून अर्ज भरता येणार आहे.

‘स्टेट बँक ऑफ इंडिया’मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; असा करा अर्ज...

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

बँकेत नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी महत्वाची माहिती समोर आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने ट्रेड फायनान्स ऑफिसरच्या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी नोंदणी करण्यासाठीची लिंक शुक्रवारपासून म्हणजेच  (दि. 7 जून) उघडली जाईल. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 27 जून असणार आहे. इच्छूक उमेदवारांना sbi.co.in या अधिकृत वेबसाईटवरून अर्ज भरता येणार आहे.

ज्या उमेदवारांचे वयवर्षे 23 ते 32 या दरम्यान आहे असे उमेदवार या रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात. तसेच आरक्षित वर्गाला नियमानुसार वयोमर्यादेत सवलत मिळणार आहे. या रिक्त पदांसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेले उमेदवार अर्ज करू शकतात. यासोबतच त्यांच्याकडे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स (IIBF) ने दिलेले फॉरेक्स मधील प्रमाणपत्र देखील असावे.  

भारतीय हवाई दलात नोकरी करण्याची संधी ; विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

SBI च्या या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, सामान्य, EWS आणि OBC श्रेणीतील उमेदवारांना 750 रुपये शुल्क भरावे लागेल. तर SC, ST आणि PH उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही. त्यांना यात सूट देण्यात आली आहे.

दरम्यान, या भरती मोहिमेद्वारे, ट्रेड फायनान्स ऑफिसरच्या एकूण १५० पदांची भरती केली जाणार आहे. याशिवाय, इतरही पदे रिक्त आहेत त्याबद्दल जाणून घेण्यासाठी उमेदवारांना वेबसाईटला भेट द्यावी लागेल.