SSC ने फोटो अपलोड करण्याच्या नियमात केला बदल; mySSC हे मोबाईल ॲप केले लाँच 

निवड पोस्ट-12 मध्ये फोटो अपलोड करण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आयोगाने हे पाऊल उचलले आहे.

SSC ने फोटो अपलोड करण्याच्या नियमात केला बदल; mySSC हे मोबाईल ॲप केले लाँच 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

स्टाफ सिलेक्शन कमिशनने (SSC) ऑनलाइन अर्जांसाठी अनिवार्य लाइव्ह फोटो अपलोड (Live photo upload) करण्याच्या नियमांमध्ये पुन्हा बदल केला आहे. निवड पोस्ट-12 मध्ये फोटो अपलोड करण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर (Complaints received) आयोगाने हे पाऊल उचलले आहे. SSC ने लाइव्ह फोटो अपलोड करण्यासाठी mySSC हे मोबाईल ॲप केले लाँच (mySSC Mobile App Launch) केले आहे. हे ॲप  विशेषतः SSC द्वारे घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांसाठी अर्ज प्रक्रिया सुलभ करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. हे ॲप उमेदवारांना फोटो अपलोड करण्यासारख्या सामान्य आव्हानांवर मात करण्यास मदत करेल, ज्यामुळे अर्ज प्रक्रिया सुलभ होईल, असा दावा SSC ने केला आहे. 

 'MY SSC' नावाचे ॲप गुगल प्ले स्टोअरवर जाऊन डाउनलोड केले जाऊ शकते. एसएससीने भरती परीक्षेतील फोटो एडिट करून फसवणूक टाळण्यासाठी थेट फोटो अपलोड करण्याचा निर्णय घेतला आहे. भरतीची अधिसूचना जारी होण्यापूर्वी तीन महिन्यांपूर्वीचा फोटो नसावा, असा नियम होता. मात्र, हा फोटो किती महिन्यांपूर्वी काढला आहे, हे शोधण्यासाठी आयोगाकडे कोणतीही यंत्रणा नव्हती. एसएससीच्या लाइव्ह फोटो अपलोडिंगच्या नियमामुळे उमेदवारांना आता पुन्हा पुन्हा फोटो काढण्यापासून मुक्तता मिळणार आहे. जेव्हा जेव्हा त्यांना अर्ज करायचा असेल तेव्हा उमेदवार 'माय एसएससी' ॲपवर जाऊन त्यांचा लाइव्ह फोटो अपलोड करू शकतील.

दरम्यान SSC ने काही दिवसांपूर्वी फोटो अपलोड करण्यासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या, त्यानुसार लाइव्ह फोटो अपलोड करण्यासाठी त्याच्याकडे चांगली प्रकाश असलेली जागा आणि साधी पार्श्वभूमी असणे आवश्यक आहे. लाइव्ह फोटो काढताना उमेदवारांना टोपी, मास्क किंवा चष्मा घालण्याची गरज नाही. जर कोणत्याही उमेदवाराने थेट फोटोच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले नाही तर त्याचा फॉर्म नाकारला जाईल.