पोलीस भरतीसाठी उमेदवारांचे वय वाढवावे, या मागणीसाठी पुण्यात रस्ता रोको  

सध्या सुरू असलेल्या पोलीस भरतीमध्ये आम्हाला एक संधी देण्यात यावी.वय वाढ झाल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही, असा आक्रमक पावित्रा या आंदोलक उमेदवारांनी घेतला.

पोलीस भरतीसाठी उमेदवारांचे वय वाढवावे, या मागणीसाठी पुण्यात रस्ता रोको  

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पोलीस भरतीच्या (Police Recruitment) उमेदवारांकडून वय वाढीच्या मागणीसाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकार विरोधात रस्ता रोको आंदोलन (Stop the road movement) केले. 2022-23 ची भरती असल्याने वयोमर्यादा त्याच पद्धतीने लागू करावी, तसेच बऱ्याच ठिकाणी पावसामुळे चिखलात मैदानी चाचणी घेण्यात आली ती रद्द करावी या मागणीसाठी पुणे शहर युवक काँग्रेसतर्फे करण्यात आली.

सरकारकडून आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने उमेदवारांनी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. एका बाजूला सध्या राज्यभरात पोलीस भरतीच्या मैदानी  चाचण्या सुरू आहेत, तर दुसरीकडे पोलीस भरतीमध्ये वय वाढ देण्यात यावे,अशी मागणी उमेदवारांनी केले. सरकारने या सगळ्या प्रक्रियेतून मार्ग काढावा, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली.यावेळी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष राहुल शिरसाट, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अक्षय जैन, उपाध्यक्ष स्वप्निल नाईक, प्रथमेश आबनावे, पुणे शहर युवक सरचिटणीस सुजित गोसावी,अजित ठोकळे, आशुतोष जाधवराव,मुरली बुधारम,ऋनेश कांबळे,विखार शेख, आनंद आगरवाल, श्रीनिवास गुट्टे, प्रशांत जाधव आदी उपस्थित होते.

 रवींद्र धंगेकर म्हणाले, विद्यार्थ्यांच्या मागणी सोबत आम्ही आहोत. सरकारने योग्य ते निर्णय घेऊन विद्यार्थी व युवकांना न्याय द्यावा.तीन महिन्यांवर विधानसभा आल्या असल्याने काहीतरी भरती केल्याचे दाखवण्यासाठी लाखो परीक्षार्थीच्या भविष्याशी खेळ होत आहे.

सध्याची होत असलेली भरती ही २०२२-२३ ची आहे त्यामुळे आम्हाला त्यानुसारच वयमर्यादा देण्यात यावी. २०२३-२४ च्या वयानुसार नको तर २०२२-२३ वयानुसार पाहिजे आहे. आम्हाला या पोलीस भरतीमध्ये एक संधी मिळाली पाहिजे हे आंदोलन त्याच्यासाठी आहे. आम्हाला एक संधी मिळालीच पाहिजे अशा प्रकारच्या घोषणा या उमेदवारांकडून देण्यात येत आहेत, अशी भूमिक या उमेदवारांनी घेतली आहे.