शिक्षणासाठी पैसे नसल्याने गुणवंत विद्यार्थीनीची आत्महत्या; दहावी होते ९३.८० गुण

अल्पभूधारक कुटुंबातील एका गुणवंत विद्यार्थीने वाढता शिक्षणाच्या खर्चाचा भार पेलत नसल्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

शिक्षणासाठी पैसे नसल्याने गुणवंत विद्यार्थीनीची आत्महत्या; दहावी होते ९३.८० गुण

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 परभणीच्या (Parbhani Crime News) आहेरवाडीतून एक धक्कादायक घटना (Shocking incident) समोर आली आहे. अल्पभूधारक कुटुंबातील एका गुणवंत विद्यार्थीने वाढता शिक्षणाच्या खर्चाचा भार पेलत नसल्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दिपीका दौलत खंदारे असे आत्महत्या (suicide) केलेल्या मुलीचे नाव आहे. या प्रकरणी पोलीसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. 

परभणी जिल्ह्यातील पुर्णा तालुक्यात असलेल्या आहेरवाडी येथील दिपिका शिक्षणात अत्यंत हुशार होती. तिने २०२२ मध्ये दहावीच्या बोर्ड परीक्षेत ९३.८० गुण मिळवले. विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन डाॅक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या दिपिकाने नांदेड येथील आर. आर. सी कोचिंग क्लासेस वस्तीगृहासाठी घेतली जाणारी परीक्षा देवून पन्नास टक्के शुल्क माफीत प्रवेश मिळवला. कुटुंबात २ एकर शेती असून इतर कोणताही उत्पन्नचा स्रोत  नव्हता. शिवाय एक भाऊ आणि बहीण यांच्याही शिक्षणाचा खर्च पेलवत नसल्याने कुटुंबावर अनेक आर्थिक समस्या आ वासून उभ्या होत्या. यातून  मार्ग काढण्याची तिने प्रयत्न केला मात्र, काहीच होत नसल्याने अखेर तिने आपली जीवनयात्री संपावली. 

बारावीला प्रवेश घेवून पुढे नीट परीक्षा देऊन मेडिकलचे  शिक्षण घेण्याचा संकल्प सोडून दिपिका दोन दिवसांपुर्वी ती घरी आली होती. ती व तिची विधवा आई मिराबाई मोठी बहिण, भाऊ रात्री जेवण करून झोपी गेले. मात्र दिपीका ही रात्री अकरा बारा वाजेपर्यंत पुस्तक हातात घेवून अभ्यास करत बसली होती. तिच्याजवळ आईही बसून जागत होती. त्यावेळी आईने तिला बाई आता झोप उशिर झालाय असे सांगितले. त्यावर दिपीकाने आपण अभ्यास करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर दिपिकाने सर्वजण झोपी गेल्याची खात्री केल्यानंतर राहत्या घराच्या किचन मधील छताच्या लोखंडी कडीला साडीबांधून गळफास घेत जिवनयात्रा संपवली. या मन हेलावून टाकणा-या घटनेमुळे आहेरवाडी परिसरासह हळहळ व्यक्त केली जात आहे.  

--------------------------------

शेतकरी, बेरोजगार युवकांनंतर आता शिक्षणासाठी पैसे नसल्याने मुलींच्या आत्महत्येची शृंखला छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात सुरू झाली आहे. ही आत्यंत दूर्दैवी बाब आहे. शासनाने मुलींच्या शिक्षणासाठी आवश्यक उपाययोजना करून त्यांना आश्वस्त करावे.त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न सोडवावा.हुशार गुणवंत विद्यार्थी पैसे नाहीत म्हणून आत्महत्या करत आहेत.हे प्रगतीशील महाराष्ट्रासाठी चांगले नाही.

- विजय गव्हाणे, जनरल सेक्रेटरी, महाराष्ट्र राज्य शिक्षणस संस्था महा मंडळ,