11th Admission : केंद्रीय प्रवेशप्रक्रियेतील जागा वाढणार, राज्यात कोटा प्रवेशाला अल्प प्रतिसाद

महाविद्यालयांमध्ये व्यवस्थापन कोटा (५ टक्के), संस्थांतर्गत कोटा (१० टक्के) आणि केवळ अल्पसंख्यांक संस्थांसाठी अल्पसंख्यांक कोटा ( ५० टक्के) अशा जागा राखीव ठेवल्या जातात.

11th Admission : केंद्रीय प्रवेशप्रक्रियेतील जागा वाढणार, राज्यात कोटा प्रवेशाला अल्प प्रतिसाद
11th Admission Process Representative Image

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

11th Admission Process : केंद्रीय प्रवेश समितीकडून पुणे (Pune), मुंबई (Mumbai), नागपूर (Nagpur), नाशिक (Nashik) व अमरावतीमध्ये (Amaravati) इयत्ता अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया (Centralised Admission Process) राबविली जात आहे. याअंतर्गत महाविद्यालयांमधील विविध कोटांतर्गत प्रवेशासाठी (Quota Admission) अल्प प्रतिसाद मिळत आहे. शुन्य फेरीत अत्यंत कमी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याने केंद्रीय प्रक्रियेत प्रवेशाच्या जागा वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महाविद्यालयांमध्ये व्यवस्थापन कोटा (५ टक्के), संस्थांतर्गत कोटा (१० टक्के) आणि केवळ अल्पसंख्यांक संस्थांसाठी अल्पसंख्यांक कोटा ( ५० टक्के) अशा जागा राखीव ठेवल्या जातात. त्यासाठी स्वतंत्र प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. त्यानंतर रिक्त जागा (व्यवस्थापन व संस्थांतर्गत कोटा) कॅप फेरीसाठी म्हणजे नियमित फेऱ्यांसाठी समर्पित केल्या जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अतिरिक्त जागा आणि महाविद्यायांचे अधिकचे पर्यायही उपलब्ध होतात.

व्यसनी शिक्षकांनो खबरदार! शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली मोठी घोषणा, लवकरच परिपत्रक काढणार

कोटांतर्गत प्रवेशाची शुन्य फेरी पार पडली असून त्याअंतर्गत प्रवेश प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. तर १८ ते २० जूनअंतर्गत विद्यार्थ्यांना कोटांतर्गत प्रवेशासाठी पुन्हा अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे. त्यानंतर २१ जून रोजी संबंधित महाविद्यालयांकडून गुणवत्ता यादी जाहीर केले जाईल आणि निवड झालेल्या विद्यार्थ्यांना २४ तारखेपर्यंत प्रवेश निश्चित करावा लागेल. त्यानंतर रिक्त जागा नियमित प्रवेश फेऱ्यांसाठी महाविद्यालयांकडून समर्पित केल्या जातील.

तर नियमित पहिल्या फेरीसाठी अर्ज करण्याची प्रक्रियाही पूर्ण झाली असून २१ तारखेलाच निवड यादी प्रसिध्द केली जाणार आहे. त्यानंतर २१ ते २४ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित करावा लागेल. पुढील फेऱ्यांसाठी कोटांतर्गत जागा समर्पित झाल्यानंतर नियमित फेरीसाठी जागा वाढणार असल्याचे चित्र आहे.

पाच शहरांतील अकरावीच्या जागांची सद्यस्थिती (दि. १९ जून) –

पुणे : कॅप – ८८ हजार ४१३

कोटा – २४ हजार ९७७, प्रवेशित – ३ हजार ५७

एकूण जागा – १ लाख १३ हजार ३९०

महाविद्यालये – ३२४

मुंबई : कॅप – २ लाख ३६ हजार ५९१

कोटा – १ लाख ४२ हजार ६८४, प्रवेशित – ९ हजार ८५४

एकूण जागा – ३ लाख ७९ हजार २७५

महाविद्यालये – १०१५

नागपूर : कॅप – ३८ हजार ९६८

कोटा – १४ हजार ५१२, प्रवेशित – ५९३

एकूण जागा – ५३ हजार ४८०

महाविद्यालये – १९४

नाशिक : कॅप – २२ हजार ३६२

कोटा – ४ हजार ३५८, प्रवेशित – ६६२

एकूण जागा – २६ हजार ७२०

महाविद्यालये – ६४

अमरावती : कॅप – ११ हजार ७७१

कोटा – ४ हजार ४०९, प्रवेशित – ७४८

एकूण जागा – १६ हजार १८०

महाविद्यालये - ६६

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo