Chandrayaan 3 Landing : इतिहास घडला! चंद्रयान-३ चे यशस्वी लँडिंग, इस्त्रोने करून दाखवलं!

चंद्रयान-३ ने ४१ दिवसांत ३.८४ लाख किमी अंतर कापून नवा इतिहास रचला आहे. यावेळी बंगळुरूमधील इस्रोच्या टेलिमेट्री अँड कमांड सेंटर (ISTRAC) च्या मिशन ऑपरेशन कॉम्प्लेक्स (MOX) मध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला.

Chandrayaan 3 Landing : इतिहास घडला! चंद्रयान-३ चे यशस्वी लँडिंग, इस्त्रोने करून दाखवलं!
Chandrayyan 3 Landing

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

मागील सव्वा महिन्यांपासून संपूर्ण जगाचे लक्ष वेधलेल्या महत्वाकांक्षी चंद्रयान-३ (Chandrayaan 3) ने आज चंद्रावर यशस्वी लँडिंग केले आणि इतिहास घडला. आजचा दिवस इस्त्रो (ISRO) आणि भारतीयांसाठी सुवर्ण दिवस ठरला आहे. चंद्राच्या (Moon) दक्षिण ध्रुवावर पोहोचणार भारत (India) पहिला देश बनला आहे. सायंकाळी ६ वाजून तीन मिनिटांनी विक्रम लँडरने (Vikram Landing) चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग केले.

चंद्रयान-३ ने ४१ दिवसांत ३.८४ लाख किमी अंतर कापून नवा इतिहास रचला आहे. यावेळी बंगळुरूमधील इस्रोच्या टेलिमेट्री अँड कमांड सेंटर (ISTRAC) च्या मिशन ऑपरेशन कॉम्प्लेक्स (MOX) मध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला. सर्व शास्त्रज्ञ एकमेकांना मिठ्या मारून आणि हस्तांदोलन करून एकमेकांना शुभेच्छा देत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून शास्त्रज्ञांसह देशवासियांचे अभिनंदन केले.  

Chandrayaan-3 Landing : इस्त्रो सज्ज, शेवटची २० मिनिटे धडधड वाढविणारी

विक्रम लँडर चंद्रावर लँड होताच रॅम्प उघडला आणि प्रज्ञान रोव्हर रॅम्पवरून चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले. जवळपास २० मिनिटांचा हा प्रवास ऐतिहासिक ठरला. विक्रम लँडरने  प्रज्ञान आणि विक्रमच्या प्रग्यानचा फोटो काढला. हे आश्चर्यचकित करणारे वैज्ञानिक दृश्य विविध टीव्ही चॅनेलवरून लाईव्ह घराघरात पहिले जात होते. 

चंद्रयान-३ ला  १४ जुलै रोजी ३ वाजून ३५ मिनिटांनी  आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून लॉन्च करण्यात आले होते. चंद्रयान-३ च्या लँडरच्या सॉफ्ट लँडिंगला १५ ते १७ मिनिटे लागली. हा सर्वात महत्वाचा टप्पा समजला जात होता.  बंगळुरू कार्यालयात मिशन ऑपरेशन टीमची तयारी आधीच  पूर्ण झाली होती.  संध्याकाळी ५ वाजून ४४ मिनिटांनी   लँडर योग्य स्थितीत येताच, टीमने  ऑटोमॅटिक लँडिंग सिक्वेन्स (ALS) लाँच केले. आणि चांद्रयान-३ चंद्रावर लँड झाले. 

 चंद्रावर उतरण्याच्या दोन तास आधी, लँडर मॉड्यूलची स्थिती आणि चंद्रावरील परिस्थितीच्या आधारे, त्या वेळी लँडिंग करणे योग्य आहे की नाही हे ठरवण्यात आले होते.  जर यावेळी  कोणताही घटक चिन्हांकित झाला असता  तर  २७ ऑगस्ट रोजी लँडिंग केले जाणार  होते. चांद्रयानचे दुसरे आणि अंतिम डिबूस्टिंग ऑपरेशन रविवारी रात्री १ वाजून ५० मिनिटांनी  पूर्ण झाले. यानंतर, लँडरचे चंद्रापासून किमान अंतर २५ किमी आणि कमाल अंतर १३४ किमी होते.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo