UPSC ESIC,  EPFO च्या 2253 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु 

या परीक्षेसाठी अर्ज करण्यास इच्छुक   उमेदवार upsc.gov.in किंवा upsconline.nic.in या अधिकृत साइटवर अर्ज करू शकतात.

UPSC ESIC,  EPFO च्या 2253 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) ने कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC), नर्सिंग अधिकारी आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO), या विभागातील 2253 रिक्त पदांसाठी भरती सुरु केली आहे. या पदांच्या प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी (Entrance Test Registration) करण्याची अंतिम तारीख 27 मार्च आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार upsc.gov.in किंवा upsconline.nic.in या अधिकृत साइटवर अर्ज करू शकतात.

UPSC च्या भरती प्रक्रियेद्वारे EPFO ​​मधील 323 पदे आणि ESIC मध्ये 1930 पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. पात्रतेशी संबंधित अधिक माहिती तपासण्यासाठी उमेदवार अधिकृत वेबसाईट upsc.gov.in किंवा upsconline.nic.in वर मदत घेऊ शकतात.

लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणीच्या आधारे या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. नर्सिंग ऑफिसर पदासाठी निवडीसाठी पेन आणि पेपर आधारित भरती परीक्षा घेतली जाईल. 

असा करा अर्ज

प्रथम उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट upsc.gov.in किंवा upsconline.nic.in ला भेट द्यावी. त्यानंतर, उमेदवाराने होमपेजवर UPSC EPFO ​​ESIC 2024 नोंदणी लिंकवर क्लिक करावे. दिसणार उमेदवारी अर्ज भरावा. यानंतर  आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे. शुल्क भरा. त्यानंतर  फॉर्म सबमिट करा. यानंतर उमेदवारांनी अर्ज डाउनलोड करावा. शेवटी, उमेदवारांनी अर्जाची प्रिंट आउट घ्यावी.