SPPU NEWS : पदवी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज सुरु 

पदवी प्रदान समारंभासाठी ऑनलाईन अर्जप्रक्रिया ११ मार्च २०२४ पासून सुरु करण्यात येत आहे.

SPPU NEWS : पदवी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज सुरु 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत (Savitribai Phule Pune University)नुकताच १२३ वा पदवीप्रदान समारंभ (Graduation Ceremony)आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर विद्यापीठाचा १२४ वा पदवी प्रदान समारंभ मे / जून, २०२४  मध्ये होणे अपेक्षित आहे. या पदवी प्रदान समारंभासाठी ऑनलाईन अर्जप्रक्रिया ११ मार्च २०२४ पासून सुरु करण्यात येत असून पदवी प्राप्त करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी पदवी, पदविका प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन विद्यापीठाच्या परीक्षा प्रमाणपत्र विभागातर्फे करण्यात आले आहे.

फक्त ऑक्टोबर / नोव्हेंबर २०२३ मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना convocation.unipune.ac.in विद्यापीठाच्या या संकेतस्थळावर दिलेल्या नमुन्यात ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. विद्यार्थी ११ मार्च ते ३० ११ मार्च या कालावधीत विनाविलंब शुल्कासह अर्ज करू शकतात. तर त्यांना ३१ मार्च ते १५ एप्रिलपर्यंत विलंब शुल्कासह अर्ज करता येणार आहे.

ऑक्टोबर / नोव्हेंबर २०२३ मध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पदवी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास पात्र आहे. अर्जाचा नमुना, शुल्क आदीबाबत सविस्तर माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर दिली आहे. पदवी किंवा पदविका प्रमाणपत्र मिळविण्याकरिता विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज योग्य शुल्कासह भरल्यानंतर अंतिम वर्षाच्या गुणपत्रिकेची छायांकित प्रत अपलोड करणे आवश्यक आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा प्रमाणपत्र विभागाकडून देण्यात आली आहे.