NEET PG 2024 साठी करेक्शन विन्डो सुरु 

विद्यार्थी केवळ वडिलांचे नाव, आईचे नाव, लिंग, सामाजिक वर्ग, उप-श्रेणी (PwB), फोटो, स्वाक्षरी, जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, जन्मतारीख आदी तपशीलांमध्ये दुरुस्ती करू शकतात.

NEET PG 2024 साठी करेक्शन विन्डो सुरु 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन (NBE) ने 10 मे पासून  NEET PG 2024 साठी  अर्ज सुधारणा विंडो सुरु केली आहे. NEET PG 2024 साठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना त्यांच्या अर्जामध्ये आवश्यक दुरुस्त्या किंवा बदल करता येऊ शकतो. उमेदवार NEET PG च्या अधिकृत वेबसाइट nbe.edu.in द्वारे NEET PG 2024 अर्जामध्ये आवश्यक दुरुस्त्या करू शकतात.

NEET PG अर्ज दुरुस्ती विंडो 16 मे पर्यंत खुली राहील. NEET PG 2024 परीक्षा 23 जून रोजी देशभरातील विविध केंद्रांवर ऑनलाइन होणार आहे.   त्या साठीचे   हॉल तिकिट 18 जून रोजी प्रसिद्ध केले जातील.  NEET PG 2024 चा निकाल 15 जुलै रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे.

विद्यार्थ्यांना NEET PG फॉर्ममध्ये नमूद केलेल्या सर्व तपशीलांमध्ये बदल करण्याची परवानगी नाही. उमेदवारांना त्यांचे नाव, फोन नंबर, ईमेल पत्ता, राष्ट्रीयत्व आणि परीक्षा शहर प्राधान्यक्रम बदलण्याची परवानगी नाही. विद्यार्थी केवळ वडिलांचे नाव, आईचे नाव, लिंग, सामाजिक वर्ग, उप-श्रेणी (PwB), फोटो, स्वाक्षरी, जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, जन्मतारीख आदी तपशीलांमध्ये दुरुस्ती करू शकतात.

NEET PG ही भारतातील वैद्यकीय संस्थांमधील MD (डॉक्टर ऑफ मेडिसिन), MS (मास्टर ऑफ सर्जरी) आणि PG डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा आहे. NEET पीजी अभ्यासक्रमांसाठी एकल प्रवेश परीक्षा विंडो म्हणून काम करते. इंडियन मेडिकल कौन्सिल कायद्यानुसार, एमएस, एमडी आणि पीजी डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी इतर कोणतीही प्रवेश परीक्षा वैध मानली जात नाही. यशस्वी उमेदवारांना सरकारी आणि खाजगी संस्थांसह 350 हून अधिक वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळेल.

अशी करता येईल दुरुस्ती

* उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट nbe.edu.in वर जा.
*   यूजर आयडी, पासवर्ड या  तुमच्या क्रेडेन्शियल्ससह लॉग इन करा.
*तुमचा NEET PG 2024 अर्ज उघडा.
*आवश्यकतेनुसार अर्ज दुरुस्ती करा.
*Save वर क्लिक करा आणि सबमिट करा.
*पुढील गरजांसाठी एक प्रत डाउनलोड करा.