RTE Admission : प्रतिक्षा यादीतील ५० टक्केच प्रवेश, आता उऱले फक्त काही तास

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. नियमित प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सध्या प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश केले जात आहेत.

RTE Admission : प्रतिक्षा यादीतील ५० टक्केच प्रवेश, आता उऱले फक्त  काही तास
RTE 2023 Admission

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (RTE Act) २५ टक्के आरक्षित जागांवर प्रतिक्षा यादीतील (RTE Waiting List) विद्यार्थ्यांना प्रवेश (RTE Admission) दिले जात असून १९ जून रोजी प्रवेश घेण्याचा अंतिम दिवस आहे. दुपारी एक वाजेपर्यंत प्रतीक्षा यादीतून निवड झालेल्या १२ हजार २२० विद्यार्थ्यांनी (Students) प्रवेश घेतले. परंतु, अजूनही तब्बल ५० टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले नाहीत. त्यामुळे शिक्षण विभागाकडून प्रतिक्षा यादीतील प्रवेशाला मुदतवाढ दिली जाणार आहे का? याबाबत उत्सुकता आहे.

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे (School Education Departrment) आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. नियमित प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सध्या प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश केले जात आहेत. नियमित प्रवेश फेरीमध्ये निवड झालेल्या ९४ हजार ७०० विद्यार्थ्यांपैकी ६४ हजार २०२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले.

11th Admission : केंद्रीय प्रवेशप्रक्रियेतील जागा वाढणार, राज्यात कोटा प्रवेशाला अल्प प्रतिसाद

प्रतीक्षा यादीत दोन प्रवेशासाठी निवड झालेल्या २५ हजार ८९२ विद्यार्थ्यांपैकी १२ हजार २३० विद्यार्थी यांनी आतापर्यंत प्रवेश घेतले आहेत. म्हणजेच अजूनही सुमारे ५० टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले नाहीत. पुणे जिल्ह्यातील (Pune District) ४ हजार ४९४ विद्यार्थ्यांचे प्रतिक्षा यादीतून प्रवेशासाठी निवड झाली आहे. त्यातील २१९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.

नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) १ हजार ३६८ विद्यार्थ्यांनीची निवड झाली तर ६६४ विद्यार्थ्यांनी आतापर्यंत प्रवेश घेतले आहेत. नागपूर जिल्ह्यातील २ हजार ९७ विद्यार्थ्यांपैकी ९४६ विद्यार्थ्यांनी तर मुंबईतील १३३७ विद्यार्थ्यांपैकी ५४६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo