3D कंपास बॉक्सची ऑनलाईन शॉपिंगमध्ये चलती; विद्यार्थ्यांमध्ये वाढते आकर्षण

२०२३-२४ हे शैक्षणिक वर्ष नुकतेच सुरु झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसोबत पालकांचीही शालेय साहित्य खरेदीची लगबग सुरु झाली आहे.

3D कंपास बॉक्सची ऑनलाईन शॉपिंगमध्ये चलती; विद्यार्थ्यांमध्ये वाढते आकर्षण
3D Compass Box Representative Image

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

अगदी कोणत्याही वर्गातील विद्यार्थी असो त्याला नवीन दप्तर, पुस्तके, गणवेश (Uniform) यासोबतच आकर्षण असते ते कंपास किंवा जॉमेट्री बॉक्सचे. पूर्वी कंपास बॉक्स म्हणजे एक पत्र्याचा किंवा प्लास्टिकचा आयताकार डबा.  3D कंपास बॉक्सची (Compass Box) चलती आहे.

२०२३-२४ हे शालेय वर्ष नुकतेच सुरु झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसोबत पालकांचीही शालेय साहित्य खरेदीची लगबग सुरु झाली आहे. शालेय साहित्य खरेदीसाठी ऑनलाईन शॉपिंग हा सुद्धा चांगला पर्याय बनत आहे. या ठिकाणी आता कंपास बॉक्स चे विविध प्रकारही उपलब्ध आहेत. त्यात विविध कार्टून कॅरेक्टर्स, ऍस्ट्रोनॉट, गाड्यांचे चित्र असलेले  3D कंपास बॉक्स आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. 

विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाकडे घेऊन जाणा-या प्रदर्शनाची विद्यापीठात मेजवाणी ..

पुर्वीच्या कंपास बॉक्समध्ये विद्यार्थी आपले पेन्सिल, पेन, कर्कटक, पट्टी वगैरे ठेवत असत. कालांतराने या कंपास बॉक्स चे रूप पालटले मग त्यात शार्पनर असलेले, दोन कप्पे असलेले, मागून पुढून दोन्ही बाजूने उघडता येणारे, वेगवेगळे चित्र असलेले असे विविध प्रकार आले. आता फ्लिपकार्ट, अमेझॉन, मिशो, जॉय मार्ट, स्केच फॅब अशा विविध ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर 3D कंपास बॉक्स उपलब्ध आहेत.

३ डी कंपासची किंमत १३५ ते ७०० रुपयांपर्यंत आहे. यामध्ये युनिकॉर्न, बार्बी, मिकी माऊस, सुपर हिरोज, ऍस्ट्रोनॉट, स्पेस, अवतार, बस, कार, बाईकचे चित्र, डायनोसॉर, शार्क, रॉकेट, लिटिल डक, कॅलक्युलेटर  असे विविध चित्र आणि आकारात असलेले 3D कंपास बॉक्स विद्यार्थ्यांना आकर्षित करत आहेत.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo