SPPU News : सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठ करणार केदार शिंदे यांचा सन्मान

सुप्रसिद्ध महाराष्ट्र शाहीर पद्मश्री कृष्णराव साबळे यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त त्यांच्यावरील महाराष्ट्र शाहीर या व सध्या चर्चेत असलेल्या बाईपण भारी देवा चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांना जाहीर करण्यात आला आहे.

SPPU News : सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठ करणार केदार शिंदे यांचा सन्मान

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे (SPPU) लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासन, ललित कला केंद्र, गुरूकुल आणि मिती फिल्म क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रपट-दिग्दर्शक व नाट्यदिग्दर्शक केदार शिंदे (Director Kedar Shinde) यांना लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे (Anna Bhau Sathe) यांच्या जयंतीदिनी पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.

सुप्रसिद्ध महाराष्ट्र शाहीर पद्मश्री कृष्णराव साबळे यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त त्यांच्यावरील महाराष्ट्र शाहीर या व सध्या चर्चेत असलेल्या बाईपण भारी देवा चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे स्वरूप पाच हजार रुपये तसेच सन्मानचिन्ह, समता सप्तक, शाल, श्रीफळ असे आहे. कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात श्री मार्तंड देव संस्थान, जेजुरीचे विश्वस्त, उद्योजक अनिल सौंदडे व व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. देवीदास वायदंडे हे विशेष  उपस्थित राहणार असून, त्यांचाही सत्कार करण्यात येणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज सुरु

पुरस्कार वितरण सोहळा दि.१ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता विधी महाविद्यालय रस्त्यावरील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या टाटा सभागृहात संपन्न होणार आहे. या पुरस्कार निवड समितीचे सदस्य डॉ. प्रशांत साठे, प्राचार्य डॉ. गणेश राऊत, डॉ. श्यामा घोणसे, प्रा. विजय रास्ते, डॉ. ज्ञानेश्वर कुंभार, डॉ. गौतम बेंगाळे, डॉ. तानाजी हातेकर आणि डॉ. सुनील भंडगे आदिंनी एकमताने केदार शिंदे यांची निवड केली.                                                     

विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य रविंद्र शिंगणापूरकर, ललित कला केंद्राचे प्रमुख डॉ. प्रविण भोळे व मिती फिल्म क्लबचे अध्यक्ष व प्रसिद्ध दिग्दर्शक मिलींद लेले हे पुरस्कार वितरण कार्यक्रमावेळी उपस्थित राहणार आहेत.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD