SPPU NEWS : वादग्रस्त नाटक प्रकरणाची प्रवीण तरडे करणार चौकशी

समितीचे अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश श्रीकृष्ण पानसे हे काम पाहणार आहेत.तर समितीमध्ये सदस्य म्हणून अभिनेता प्रवीण तरडे, प्राचार्य डाॅ. देवीदास वायदंडे, अधिसभा सदस्य विनायक आंबेकर, डाॅ. ज्योती भाकरे, प्राचार्य डाॅ. क्रांती देशमुख यांचा समावेश आहे.

SPPU NEWS : वादग्रस्त नाटक प्रकरणाची प्रवीण तरडे करणार चौकशी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Savitribai Phule Pune University) ललित कला केंद्रात (Center for Fine Arts)सादर केलेल्या वादग्रस्त नाटकाचे तीव्र पडसाद उमटले आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने चौकशी समिती स्थापना करण्यात आली असून सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखालील समितीतर्फे या घटनेचे सत्यशोधन केले जाणार आहे. त्यात अभिनेता प्रवीण तरडे (Actor Pravin Tarde) यांच्यासह इतर सदस्यांचा समावेश आहे. 

विद्यापीठाने स्थापना केलेल्या समितीचे अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश श्रीकृष्ण पानसे हे काम पाहणार आहेत.तर समितीमध्ये सदस्य म्हणून अभिनेता प्रवीण तरडे, प्राचार्य डाॅ. देवीदास वायदंडे, अधिसभा सदस्य विनायक आंबेकर, डाॅ. ज्योती भाकरे, प्राचार्य डाॅ. क्रांती देशमुख सदस्य म्हणून तर विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डाॅ. विजय खरेया समितीचे सदस्य सचिव आहेत.

हेही वाचा: वादग्रस्त नाटक प्रकरण : विद्यापीठाकडून सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधन समिती स्थापना

नाटकावरून घडलेलल्या घटनेबाबत आखील भारतीय विद्यार्थी परिषदेसह सर्व कर्मचारी संघटना, महाराष्ट्र नावनिर्माण विद्यार्थी सेना, युवासेना, पतित पावन संघटना, भारतीय जनता पक्ष, विश्व हिंदू परिषद बजरंग दल, शिवसेना, महाराष्ट्र नावनिर्माण सेना, हिंदू वडार संघटन, समस्त आजी-माजी विद्यार्थी कृती समिती, मातंग समाज विकास आघाडी, दलित बिग्रेड संघटना, विद्यापीठातील विविध प्राध्यापक यांचे निवेदन विद्यापीठाला प्राप्त झाले आहे.

 विद्यापीठाकडे निवेदनाद्वारे प्राप्त झालेल्या तक्रारींचे या समितीतर्फे सत्यशोधन केले जाणार आहे.या समितीला एक महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. तसेच समितीच्या अध्यक्षांनी दिनांक व वेळ निश्चित करून कामास सुरूवात करावी,अशा सूचना विद्यापीठातर्फे दिल्या गेल्या आहेत.