शिक्षिकाबाईंची अशी ही बनवाबनवी! नोकरीसाठी लावले बहिणीचे नाव

शिक्षण अधिकाऱ्यांच्या चौकशीत हे बिंग फुटल्यानंतर शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. विस्तार अधिकारी (शिक्षण) किसन भुजबळ यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

शिक्षिकाबाईंची अशी ही बनवाबनवी! नोकरीसाठी लावले बहिणीचे नाव
Pune Zila Parishad Bogus Teacher

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सरकारी नोकरी म्हटले की त्यासाठी अनेकांच्या उड्या पडतात. एका जागेसाठी हजारो जण प्रयत्न करत असतात. एका महिलेने तर आलेली संधी सोडायची नाही, यासाठी थेट बहिणीच्या कागदपत्रांचा वापर केला. बहिणीची प्रमाणपत्रे (Fake Documents) आपलीच असल्याचे भासवण्यासाठी गॅझेटमध्ये नाव बदलून घेतले. एवढेच नाही तर जन्मतारीखही बहिणीचीच लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिक्षण अधिकाऱ्यांच्या (Education Officer) चौकशीत हे बिंग फुटल्यानंतर शिक्षण विभागात (Education Department) खळबळ उडाली आहे. (Cheating the government by using sisters name to become a teacher)

शिक्षणविषयक ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. http://eduvarta.com/

विस्तार अधिकारी (शिक्षण) किसन भुजबळ (Kisan Bhujbal) यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, संगिता झुरुंगे यांनी यांनी खोट्या नावाने बहिणीच्या शाळेचे कागदपत्रे वापरून तसेच बनावट कागदपत्रे तयार करून त्याआधारे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकाची नोकरी मिळवली. यासंदर्भात त्यांच्याविरोधात अमित कचरू झुरुंगे यांची तक्रार आल्यानंतर चौकशी करून शिक्षणाधिकाऱ्यांना ३ ऑक्टोबर २०२२ रोजी अहवाल सादर केला. २०००-२००१ मध्ये वस्ती शाळा योजना सुरू झाली. झुरुंगे काम करत असलेल्या शाळेची जबाबदारी ग्रामपंचायतीची होती. अर्हताधारक स्वयंसेवक नियुक्त्या करण्याची जबाबदारीही ग्रामपंचायतीची होती. या नियुक्त्या प्रतिमहा एक हजार रुपये याप्रमाणे दहा महिन्यांसाठी केल्या होत्या. शासन निर्णयानुसार वस्ती शाळेवर स्वयंसेवक नियुक्ती करण्यासाठी संबंधित वस्तीवरील किमान अर्हता डी.एड.पदिवकाधारक आणि डीएड पदविकाधारक उपलब्ध न झाल्यास बारावी उत्तीर्ण उमेदवारातून नियुक्ती करायची होती. शासनाने २००८ मध्ये ३ हजार ३८४ वस्तीशाळांचे नियमित प्राथमिक शाळांत रुपांतर करण्याचा आणि ६८६ वस्तीशाळा बंद करण्याचा निर्णय घेतला.

रुपांतर करताना शाळांमध्ये प्रतिशाळा दोन शिक्षक याप्रमाणे ६ हजार ७६८ प्राथमिक शिक्षक पदे निर्माण करण्यास मान्यता दिली. त्यामध्ये एक शिक्षक नियमित देण्याचा व अर्धा शिक्षक म्हणजे एक निमशिक्षक वस्तीशाळेतील स्वयंसेवकमधून भरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी डीएड पदविकाधारक किंवा बारावी उत्तीर्ण पात्रता बंधनकारक होती. डीएड नसलेल्या निमशिक्षकांना पत्राद्वारे डीएडची संधी देण्याची तरतुद करण्यात आली होती. २०१४ मध्ये वस्ती शाळा निमशिक्षकांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून सेवेत सामावून घेण्याचा निर्णय झाला. मगरवस्ती वस्तीशाळेवर उपशिक्षिका म्हणून संगिता झुरुंगे यांनी १२ जून २००६ ते फेब्रुवारी २०१४ अखेर निमशिक्षक म्हणुन काम केले आहे. तसेच एक मार्च २०१४ पासुन त्यांनी प्रशिक्षित अपदवीधर वेतन श्रेणी मध्ये काम करून अद्यापपर्यंत वेतन घेत आहेत.

अशी केली फसवणूक

संगिता झुरुंगे यांची शैक्षणिक पात्रता फक्त अकरावी उत्तीर्ण एवढीच आहे. त्यांनी स्वयंसेवक/ निमशिक्षक म्हणून नोकरीला लागताना त्यांची बहीण रुपाली ज्ञानेश्वर टिळेकर यांचे बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्राचा वापर करुन नोकरी मिळविली आहे. झुरुंगे या आजपर्यंत बारावी उत्तीर्ण देखील नाहीत. अधिक चौकशीमध्ये त्यांनी हुतात्मा राजगुरु महाविद्यालय राजगुरुनगर येथून अकरावी उत्तीर्ण केली. परंतु बारावी मध्ये प्रवेशदेखील घेतला नसल्याचे निष्पन्न झाले आहे. त्या स्वतः बारावी उत्तीर्ण नसल्यामुळे त्यांनी बहिणीचे कागदपत्रांचा वापर करून नोकरी मिळविलेली आहे. संगिता आणि रुपाली या संख्या बहिणी असुन रुपाली अस्तित्वात असताना संगिताने रुपाली म्हणजे मीच संगीता आहे असे भासवुन तिच्या कागदपत्रांचा वापर केला, तसे गॅझेट करून घेतले. रुपालीची जन्मतारीख संगिताने स्वतःचे आधार कार्डवर लावून घेतली आणि स्वतःची जन्मतारीख दि. ०५/०७/१९७५ असताना रुपालीच्या कागदपत्रांवरील जन्मतारीख सिद्ध करता यावी म्हणून दि. ११/०१/१९७७ अशी आधार कार्डवर लावली व सेवापुस्तकावर लावली आहे.

शासनाने कार्यरत असलेल्या निमशिक्षकांना डीएड पुर्ण करण्याची संधी दिलेली होती. त्यासाठी किमान अर्हता बारावी उत्तीर्ण आवश्यक होती. संगिता झुरुंगे या बारावी उत्तीर्ण नसल्याने त्यांनी त्यांची बहीण रुपाली ज्ञानेश्वर टिळेकर हिचे नाव गॅझेटला संगिता दत्तात्रय झुरुंगे असे दि. ०६ ते १२/०९/२०१२ रोजीचे महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिध्दी देवुन बदल केला आणि पुढे त्या रुपाली ज्ञानेश्वर टिळेकर हे नाव बदलून संगिता दत्तात्रये झुरुंगे या नावाने वावरू लागल्या. त्यामुळे अशी दोन पात्र तयार झाली. १. संगिता ज्ञानेश्वर टिळेकर - संगिता दत्तात्रय झुरुंगे, २. रुपाली ज्ञानेश्वर टिळेकर - संगिता दत्तात्रय झुरुंगे, अशी पात्र तयार केली. निम शिक्षकामधून शासन निर्णयाचा फायदा घेण्यासाठी त्यांनी रुपाली ज्ञानेश्वर टिळेकर यांच्या नावाचे १० वी व १२ वी उत्तीर्णचे कागदपत्रे, जात पडताळणी या प्रमाणपत्रांचा वापर करुन डीएड करीता प्रवेश मिळविला. जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था पुणे मार्फत महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे पार्वतीबाई अध्यापिका विद्यालय कर्वेनगर पुणे येथून डीएड पदविका मिळविली.

रुपाली ज्ञानेश्वर टिळेकर हिने डीएड केले नाही. तर तिच्या कागदपत्रांचा वापर करून अकरावी उत्तीर्ण असलेल्या संगिता झुरुंगे यांनी खोटे नाव धारण करुन डीएड कोर्स पुर्ण केला. या डीएड प्रमाणपत्राचा वापर करुन आणि त्यांची बहीणीची कागदपत्रे सादर करून मीच संगिता दत्तात्र्य झुरुंगे (रुपाली ज्ञानेश्वर टिळेकर) भासवून दि. १२/०६/२००६ ते दि.३१/०८/२०२२ पर्यंत वेळोवेळी स्वयंसेवक निमशिक्षक मानधन व प्रशिक्षीत अपदवीधर वेतन श्रेणीतील वेतनापोटी खोटया बनावट नावाने नोकरी मिळवून शासनाची ४० लाख ६२ हजार ८४६ इतक्या रकमेची आर्थिक फसवणुक केली आहे, असे जबाबात नमूद करण्यात आले आहे.